National Cinema Day Offer: मेगा ऑफर!!! फक्त 99 रुपयात पाहा कोणताही चित्रपट, कधी आणि कुठे वाचा सविस्तर

National Cinema Day Offer: चित्रपट रसिकांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. आता कोणताही चित्रपट तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली आहे. येत्या 13 ऑक्टोबर रोजी मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ही ऑफर देण्यात येणार आहे.

Updated Sep 22, 2023 | 11:58 AM IST

National Cinema Day Offer

National Cinema Day Offer Watch any movie at just Rs 99 Read more when and where

National Cinema Day Offer: तुम्ही तुमचा आवडता चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता कोणताही चित्रपट तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत घोषणा केली आहे. येत्या 13 ऑक्टोबर रोजी मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ही ऑफर देण्यात येणार आहे.
13 ऑक्टोबर रोजी कोणत्याही चित्रपट तिकिटाची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. गेल्या वर्षीही हा दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा देखील कमी दरात चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. आता पुन्हा एकदा हा दिवस सिनेप्रेमींसाठी आनंदाचा ठरणार आहे. या दिवशी जवान असो किंवा गदर 2 या चित्रपटांची तिकिटं तुम्हाला फक्त 99 रुपयात बूक करता येणार आहे.

4000 हून अधिक स्क्रीन

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांनी एकत्र येऊन चित्रपट रसिकांसाठी एक अविस्मरणीय चित्रपट मॅरेथॉन तयार केली आहे. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी देखील राष्ट्रीय चित्रपट दिन 4000 हून अधिक स्क्रीनवर साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षी एकाच दिवसात सर्वाधिक 6.5 दशलक्ष लोकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला होता.गेल्या वर्षी 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सुवर्ण संधी

हा विशेष प्रसंग सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सिनेमाच्या आनंद घेण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांकडे आहे. जे प्रेक्षक अजूनही त्यांच्या स्थानिक सिनेमाकडे परतले नाहीत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

कधी आणि कुठे पाहता येईल चित्रपट?

हा नियम 23 सप्टेंबरपासून देशभरातील 4000 स्क्रीनवर लागू होणार आहे. यात PVR, Inox, Cinepolis, Mirage, Citypride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight यासह अनेक मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहा समावेश आहे. या सर्व चित्रपटगृहात जाऊन तुम्ही 99 रुपयांत चित्रपट पाहू शकता.
ताज्या बातम्या

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages

सनरुफ, क्लासिक लुकसह Yakuza Karishmaची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत 1.70 लाख रुपये!

   Yakuza Karishma     170

Nagpur Crime : नाश्ता मिळाला नाही, रागाच्या भरात सोडलं घर; रेल्वे स्थानकाजवळ झाडाला...

Nagpur Crime

Lion Attack: बोट दाखवणाऱ्याला सिंहाने शिकवला धडा, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती

Lion Attack      Video

Pune Crime : विद्येच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घातला लाखोंचा गंडा

Pune Crime

Airoli-Katai Naka Freeway: डोंबिवली-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; ऐरोली-काटई बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार

Airoli-Katai Naka Freeway -     -  45   10

Kashmir Tourism: हिवाळ्यात काश्मीरला फिरायला जाताय? या चुका अजिबात करू नका

Kashmir Tourism
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited