Nitesh Pandey Death News: मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का, नितेश पांडे यांचं निधन

Nitesh Pandey Death News: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिच्या अपघाती निधनाने संपूर्ण इंडस्ट्री दु:खात असताना टीव्ही एक्टर नितेश पांडे यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे.

Updated May 24, 2023 | 10:45 AM IST

Nitesh Pandey Death News, nitesh pandey death news, nitesh pandey, anupamaa, cardiac arrest

Nitesh Pandey Death News, nitesh pandey death news, nitesh pandey, anupamaa, cardiac arrest

Anupama Actor Nitesh Pandey Dies at 51: मनोरंजन विश्वातून आणखी एक दु:खद बातमी आहे. 'अनुपमा' मालिकेत रुपाली गांगुली यांची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणारे कलाकार नितेश पांडे यांचं निधन झालं. नितेश पांडे यांना मंगळवारी रात्री उशीरा हृदयविकाराचा तिव्र झटका (cardiac arrest) आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. नितेश हे 51 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
याआधीच 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिच्या अपघाती निधनाने संपूर्ण इंडस्ट्री दु:खात असताना नितेश यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे.
लेखक सिद्धार्थ नागर यांनी नितेश पांडे यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. सिद्धार्थ नागर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. सिद्धार्था हे मंगळवारी रात्री एका कार्यक्रमातून घरी परत येत असताना त्यांनी नितेश पांडे यांच्या निधनाचे वृत्त समजले.

इगतपुरीत आला कार्डियक अरेस्ट

नितेश पांडे हे शूटिंगसाठी इगतपुरी येथे गेले होते. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांला त्यांना कार्डियक अरेस्ट आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नितेश पांडे यांचे पार्थिव मुंबईत कधी आणणार याबाबत मात्र समजू शकलेले नाही.

शाहरुख खानच्या असिस्टेंटची भूमिका

नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता. नितेश यांनी चित्रपटांसह टीव्ही इंडस्ट्रीतही नशीब आजमावलं. चित्रपत्रांच्या तुलने टीव्ही मालिकेतूनच त्यांना जास्त लोकप्रियता मिळाली. 'ओम शांति ओम' चित्रपटात नितेश यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या असिस्टेंटची भूमिका केली होती. 'दिशा परमार', 'नकुल मेहता स्टार शो', 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार'मध्येही नितेश प्रमुख भूमिकेत दिसते.

नितीश पांडे यांनी थाटला होता दुसरा संसार

नितेश पांडे यांचा अश्विनी कालेसकर यांच्यासोबत 1998 मध्ये विवाह झाला होता. परंतु 2002 मध्ये दोघांनी काडीमोड घेतली. त्यानंतर अर्पिता पांडे या टीव्ही एक्ट्रेससोबत नितेश यांनी दुसऱ्यांदा संसार थाटला होती.

नितेश पांडे यांची अशी राहिली कारकीर्द...

नितीश पांडेने यांनी सन 1995 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. 'तेजस', 'साया', 'मंजिलें अपनी अपनी', 'जुस्तजू', 'हम लड़कियां', 'सुनैना', 'कुछ तो लोग कहेंगे', 'एक रिश्ता साझेदारी का', 'महाराजा की जय हो', 'हीरो-गायब मोड ऑन' सोबतच 'अनुपमा'मध्ये धीरज कपूरची भूमिका केली. याशिवाय 'ओम शांति ओम', 'बधाई दो', 'मदारी', 'दबंग 2' सारख्या चित्रपटात देखील काम केलं होतं.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited