सारा अली खानचा भाऊ इब्राहिम लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Ibrahim Debut Bollywood: सैफ अली खान आणि अमृता अरोरा यांचा मुलगा इब्राहिम अली खान हा देखील आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारी आहे. सारा अली खानने नुकतीच एका मुलाखतीमध्ये याबाबत माहित दिली. तो लवकरच डेब्यू करणार असून त्याच्या फिल्मचे शुटिंग देखील पूर्ण झाल्याचं तिने सांगितलं.

Updated May 22, 2023 | 11:14 AM IST

sara ali khan brother ibrahim debut bollywood.

sara ali khan brother ibrahim debut bollywood

फोटो साभार : BCCL
Ibrahim Debut Bollywood: सैफ अली खान आणि अमृता अरोरा यांचा मुलगा इब्राहिम अली खान हा देखील आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारी आहे. सारा अली खानने नुकतीच एका मुलाखतीमध्ये याबाबत माहित दिली. तो लवकरच डेब्यू करणार असून त्याच्या फिल्मचे शुटिंग देखील पूर्ण झाल्याचं तिने सांगितलं. इब्राहिम करण जोहरच्या रॉकी आणि राणीच्या लव्ह स्टोरीमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होता. रॉकी आणि राणीच्या या लव्ह स्टोरीमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. (Sara Ali Khan Brother Ibrahim Debut Bollywood)
साराने सांगितले की, तिचा भाऊ इब्राहिमने त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आम्ही दोघेही भावनिक आहोत. इब्राहिम जेव्हाही शूटिंगवरून परत यायचा तेव्हा मी त्याची खूप काळजी घ्यायची. मी माझ्या आईप्रमाणेच सर्व काही करते. मला अजूनही विश्वास बसत नाही की त्याने अभिनेता म्हणून त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. माझ्यातही आईचं हृदय आहे हे मला या काळात जाणवलं.
इब्राहिमच्या डेब्यू चित्रपटाचे नाव सरजमीन आहे. या चित्रपटात एकही प्रमुख अभिनेत्री नाही. या चित्रपटात इब्राहिम हा एकमेव मुख्य अभिनेता आहे. बोमन इराणी यांच्या मुलाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात इब्राहिमसोबत काजोलही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या नाव आणि कलाकारांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा 2004 साली घटस्फोट झाला आहे. यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले. सारा आणि इब्राहिमचे करिनासोबत चांगले बॉन्डिंग आहे. सारा आणि इब्राहिम अनेकदा त्यांच्या वडिलांसोबत दिसून येतात. साराने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले आहे. सध्या ती तिच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited