Shloka Mehta Pregnant: अंबानी कुटुंबाची थोरली सुनबाई श्लोका मेहताच्या डोहाळे जेवणाचे फोटो झाले व्हायरल

Pregnant Shloka Mehta's Unseen Photos: श्लोका मेहताने NMACC लाँच दरम्यान तिच्या गरोदरपणाबद्दल जाहीर केले होते त्यानंतर ती अनेक वेळा तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली आहे. आता, श्लोका मेहताचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत क्षण घालवताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून श्लोकाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमादरम्यानचा हा फोटो असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Updated May 25, 2023 | 12:46 PM IST

shloka mehta pregnant Baby Shower photos Get Viral On Social Media

shloka mehta pregnant Baby Shower photos Get Viral On Social Media

Pregnant Shloka Mehta's Unseen Photos: देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबांपैकी एक म्हणजे अंबानी कुटुंब. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुले आहेत, त्यापैकी दोन विवाहित आहेत आणि एकाचे लग्न होणार आहे. या बिझनेस कपलचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता गरोदर असून लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. श्लोका मेहताने NMACC लाँच दरम्यान तिच्या गरोदरपणाबद्दल जाहीर केले होते त्यानंतर ती अनेक वेळा तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली आहे. आता, श्लोका मेहताचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत क्षण घालवताना दिसत आहे. तिचा हा फोटो ईशा अंबानी हिने आपल्या सोशल मिडियावर शेअर केला असून, श्लोकाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमादरम्यानचा हा फोटो असल्याचे तिने सांगितले आहे.
तुम्ही पण हा फोटो जरूर पहा.-

श्लोका मेहताच्या बेबी शॉवरचा व्हायरल फोटो

श्लोका मेहताचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणसोबत पोज देताना दिसत आहे. श्लोका आणि आकाश अंबानी यांना पृथ्वी अंबानी हा पहिला मुलगा असून, त्याच्या मित्रांच्या आईने खास श्लोकासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या ग्रुप फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की श्लोकाने शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि तिच्या डोक्यावर फुलांचा मुकुट देखील आहे.

श्लोकाने अनेक वेळा तिचा बेबी बंप दाखवला आहेप्रेगनेन्ट श्लोका मेहता अनेकदा बाहेर आपल्या बेबी दाखवताना दिसली आहे. NMACC लाँच झाल्यापासून, श्लोकाला आयपीएल सामन्यांमध्ये आणि होम टीम मुंबई इंडियन्सच्या सरावां दरम्यान तिला अनेकदा पाहिले आहे, तसेच गरोदर श्लोकाने आपल्या पतीसोबत सिद्धिविनायक मंदिराला भेट देखील दिली होती.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited