Agnihotra 2: मराठीत छोट्या पडद्यावर एक काळ गाजवलेली मालिका अग्निहोत्र लवकरच परततणार

मालिका-ए-रोज
Updated Oct 18, 2019 | 15:19 IST | चित्राली चोगले

मराठीत छोट्या पडद्यावर १० वर्षांपूर्वी एक अतिशय लोकप्रिय मालिका येऊन गेली, ती म्हणजे अग्निहोत्र. ज्या कथेनं मराठी टेलिव्हिजनवर घडवला इतिहास. त्याच अग्निहोत्रचा सुरु होणार नव्याने प्रवास स्टार प्रवाह वाहिनीवर.

a show that created a milestone in marathi television industry agnihotra is all set to return with a sequel agnihotra 2
Agnihotra 2: मराठीत छोट्या पडद्यावर एक काळ गाजवलेली मालिका अग्निहोत्र लवकरच परततणार 

थोडं पण कामाचं

  • मराठी टेलिव्हिजनवर इतिहास घडवणारी मालिका 'अग्निहोत्र' परतणार
  • तब्बल १० वर्षांनंतर 'अग्निहोत्र २'ची घोषणा
  • 'अग्निहोत्र २' लवकरच स्टार प्रवाहवर भेटीला येणार

मुंबई: २००८च्या नोव्हेंबरच्या महिन्यात मराठी टेलिव्हिजनवर एक वेगळाच प्रवास सुरु झाला. एक नवीन मालिका भेटीला आली आणि मालिकेने इतिहास घडवला. ही मालिका म्हणजे सगळ्यांची लाडकी अग्निहोत्र. याच मालिकेचा पुढचा भागा येणार असं अनेकदा या १० वर्षात बोललं गेलं. अखेर त्या बाबतीत आता एक ठाम अशी घोषणा झाली आहे. तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होणार असं जाहीर केलं गेलं आहे. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. तिच कथा पुढे सरकरणार का? गाजलेली पात्र पुन्हा दिसणार का? १० वर्षांनंतर मालिकेत काय नेमकं घडणार? हे आणि असे अनेक प्रश्न ही घोषणा होताच उद्भवले आहेत. चला पाहुयात याची उत्तरं मिळतात का ते.

‘अग्निहोत्र २’ मालिका जाहीर होताच या मालिकेमध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे अग्निहोत्र मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘अग्निहोत्र २’साठीही जोरदार तयारी सुरु झाली असल्याचं  समजतंय. अग्निहोत्र २ मध्ये कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता वाढलीय. कारण मालिकेचं पहिलं पर्व यशस्वी करण्यात त्या मालिकेच्या स्टारकास्टचा सिंहाचा वाटा होता.

 

अग्निहोत्र ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरण्यात मालिकेचं दिग्दर्शन देखील खूप महत्त्वाचा घटक ठरला. त्या काळी असलेला तरुण दिग्दर्शक सतीश राजवाडे तेव्हा या मालिकेमुळे खूप गाजला. विशेष म्हणजे या मालिकेचं दुसरं पर्व ज्या वाहिनीवर सुरु होणार आहे त्या विहिनीचे कार्यक्रम प्रमुख आता खुद्द सतीश आहेत. अग्निहोत्र २ विषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणं हे भारावून टाकणारं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आहे. जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पाहिले असल्याने तो दर्जा टिकवणं हे आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It's a privilege to be a part of history again. Blessed...!!! Agnihotra-2 #Agnihotra2 #StarPravah

A post shared by Satish Rajwade (@rajwadesatish) on

 

अग्निहोत्र मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेविषयी सांगताना कथाकार श्रीरंग गोडबोले म्हणाले, ‘कुटुंबापासून दूर गेलेली माणसे जेव्हा आपल्याच भूतकाळातील पाळामुळांचा शोध घेत जातात तेव्हा निश्चितच एक गूढ जन्माला येतं आणि तेच गूढ याही मालिकेचा आत्मा आहे. आजवर केलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र ही मालिका खूपच जवळची आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे.’ अग्निहोत्र २चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आणि या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेबद्दल अधिक माहिती मिळण्याची आता सगळेच वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी