आदित्य विरुद्ध आदित्य... 'माझा होशिल ना' मालिकेत तोतयाचा 'गोंधळ'

झी मराठी वाहिनीवर दिसणाऱ्या 'माझा होशिल ना' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत लवकरच एक नवा ट्विस्ट येणार आहे.

Aaditya v Aaditya in Majha Hoshil Na Zee Marathi TV Serial
आदित्य विरुद्ध आदित्य... 'माझा होशिल ना' मालिकेत तोतयाचा 'गोंधळ' 

थोडं पण कामाचं

  • आदित्य विरुद्ध आदित्य... 'माझा होशिल ना' मालिकेत तोतयाचा 'गोंधळ'
  • ब्रम्हे मामांना आणि सई-आदित्यला कराव्या लागणाऱ्या कसरती पुढील भागांमध्ये दिसतील
  • खऱ्या आदित्यच्या हाती कंपनीचे नियंत्रण कधी आणि कसे येईल?

मुंबईः झी मराठी वाहिनीवर दिसणाऱ्या 'माझा होशिल ना' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत लवकरच एक नवा ट्विस्ट येणार आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा खरा मालक आदित्य देसाई कारभाराचे नियंत्रण हाती घेणार असे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाईल आणि एक नवा माणूस आदित्य देसाई म्हणून समोर येईल. यामुळे आदित्य विरुद्ध आदित्य असा नवा संघर्ष सुरू होईल. Aaditya v Aaditya in Majha Hoshil Na Zee Marathi TV Serial

तोतया आल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळातून मार्ग काढणे, खऱ्या आदित्यच्या हाती कंपनीचे नियंत्रण सोपवणे हे उद्योग करण्यासाठी आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचे ट्रस्टी असलेल्या ब्रम्हे मामांना आणि सई-आदित्यला कराव्या लागणाऱ्या कसरती पुढील भागांमध्ये दिसतील. 

तोतयाचे बिंग कसे आणि कधी फुटेल?... खऱ्या आदित्यच्या हाती कंपनीचे नियंत्रण कधी आणि कसे येईल?.... या प्रश्नांची उत्तरे झी मराठी वाहिनीवर दिसणाऱ्या 'माझा होशिल ना' या लोकप्रिय टीव्ही मालिकेच्या पुढील भागांमधून मिळणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी