Aai kuthe kay karate : स्मॉल स्क्रीनवरील (small screen serial) गाजत असलेल्या मालिकांमधील एक म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karate) ही मालिका. या मालिकेची क्रेझ संपू्र्ण महाराष्ट्रात आहे. अरुंधती हे पात्र तर अगदी खेडेगावापासून शहरातील घराघरांमध्ये माहिती आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते थेट घरातल्या आजीबाईंपर्यंत सारेच या मालिकेचे चाहते आहेत. या अरुंधतीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. घरातील तमाम आईंचं दु:ख मालिकेने मांडलं. त्यामुळे ही मालिका खूप हीट झाली. मध्यंतरीच्या काळात मालिकेत अनेक ट्विस्ट आले. काही ट्विस्ट प्रेक्षकांनी आपलेसे केले तर काहींना नावं ठेवली. आता तर चक्क मालिकेचं नावंच बदलून टाका असा सल्ला प्रेक्षकांकडून दिला जात आहे.
अधिक वाचा : दिशा पटानीची 'ती' पोस्ट चर्चेत
मालिकेत सध्या सुरू असलेला ट्रॅक प्रेक्षकांना फारसा आवडलेला नाही. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट होतो, अरुंधती देशमुखांचं घर सोडते. दुसरीकडे राहायला जाते. त्यावेळी अचानक तिच्या आयुष्यात तिचा कॉलेज फ्रेण्ड आशुतोष केळकर येतो. आता आशुतोष आणि अरुंधतीचं नातं जुळण्याच्या मार्गावर आहे. तर इकडे संजना आणि अनिरुद्धचं लग्न होऊनही अनिरुद्ध अरुंधतीवर हक्क गाजवताना दिसतोय. दुसरीकडे, अभि आणि अनघा आई-बाबा होणार आहेत तर आता अभिच्या आयुष्यात दुसरी संजना येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला खूप वैतागले आहेत. त्यामुळे आता मालिकेचं नावबदलण्याचाच सल्ला प्रेक्षकांनी दिला आहे. "मालिकेचं नाव 'आई कुठे काय करते' असण्यापेक्षा 'कोण कुठे लफडी करू शकतो', असं ठेवा," असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : उर्फी जावेद 'या' अवतारामुळे पुन्हा एकदा ट्रोल
मालिकेत सध्या आई या पात्रापेक्षा इतरांनाच महत्त्व दिलं जात आहे. त्यात आता संजनासुद्धा प्रेग्नंट असल्याचं दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मालिकेचं नाव बदलण्याचा सल्ला प्रेक्षकांनी दिला आहे.