Aai kuthe kay karate : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट, यश-गौरीच्या नात्यात कायमचा दुरावा?

मालिका-ए-रोज
Updated Oct 27, 2022 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aai kuthe kay karate : 'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karate) मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्याची भीती साऱ्या प्रेक्षकांना होती तेच आता मालिकेत घडताना दिसणार आहे. यशच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक नवं संकट येणार आहे.

Aai kuthe kay karate serial twist
'आई कुठे काय करते'मध्ये ट्विस्ट पे ट्विस्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यश-गौरीचं नातं टिकणार की कायमचे दुरावणार?
  • दिवाळीच्या मुहू्र्तावर मालिकेत येणार सॉलिड ट्विस्ट
  • यश आणि गौरीचं नातं काय वळण घेणार?

Aai kuthe kay karate : आई कुठे काय करते ( Aai kuthe kay karate) या मालिकेने पुन्हा एकदा पकड घेतलेली दिसत आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात ही मालिका मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. मालिकेचे चाहतेही लाखो आहेत.  मालिकेतील पात्रांनी थेट प्रेक्षकांच्या काळजालाच हात घातलाय. प्रेक्षकांचं या मालिकेवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच टीआरपीच्या स्पर्धेतही मालिका कायम पहिल्या पाच नंबरांमध्ये असते. आईवर आधारित ही मालिका असल्याने ओघानेच आईबरोबर इतरही पात्र तितकीच महत्त्वाची या मालिकेत दाखवण्यात आली आहे. मालिकेत काही ना काही घडतच आहे. आता या मालिकेत एक सॉलिड ट्विस्ट येणार आहे. अरुंधतीचा मुलगा यशच्या आयुष्यात नवं संकट येणार आहे. यश आणि गौरी एकमेकांपासून कायमचे दुरावणार असल्याचं चिन्ह मालिकेत दिसत आहे. (Aai kuthe kay karate serial twist yash and gauri will seperate going america)

अधिक वाचा : हॉटेलमध्ये एकटं राहायची वाटते भिती?

मालिकेत आता एक सॉलिड ट्विस्ट आला आहे. गौरी अमेरिकेला गेल्याचं दाखवण्यात आलं होतं, तेव्हाच गौरी यशला कायमचं सोडून जाणार असा अंदाज सूज्ञ प्रेक्षकांनी बांधला होता. मात्र, आता प्रेक्षकांचा हा अंदाज खरा होत असल्याची चिन्हं मालिकेत दिसत आहेत. यश आणि गौरीच्या नात्यात दुरावा येणार आहे. देशमुख कुटुंबात सध्या दिवाळी साजरी करण्यात येत आहे. गौरीसुद्धा अमेरिकेहून परत आलेली आहे. गौरी अमेरिकेला असताना यशकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं दिसलं होतं. आता ती अमेरिकेहून परत आलेली असली तरी दिवाळीच्या मुहूर्तावर गौरी यशला तिचा मोठा निर्णय सांगणार असल्याचं मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे. 

अमेरिकेत एका मोठ्या डिझायनर फर्मकडून गौरीला कामासाठी ऑफर आलेली आहे. त्यामुळे तिने पुन्हा अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपला हा निर्णय गौरी यशला सांगताच यशला मोठा धक्का बसला आहे. गौरीविषयी यशला जी शंका होती तेच आता मालिकेत घडताना दिसणार आहे. तर दुसरीकडे या सगळ्याचा फायदा उचलत अनिरुद्ध यशला गौरीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अनिरुद्ध यशला सांगतो, "बायकांना पैसा, प्रसिद्धी मिळाली की त्या घर सोडतात, गौरीही तेच करतेय, ती संजनाची भाची आहे. स्वार्थी आहे तिच्यासारखी. जास्त अपेक्षा ठेऊ नकोस." अनिरुद्ध आणि संजनासुद्धा घटस्फोट घेणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर अनिरुद्ध यशला गौरीविरोधात भडकवत असल्याचं दिसणार आहे. मात्र, आता गौरीच्या या निर्णयावर यश कसा रिएक्ट होणार? तो कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता आहे. 

अधिक वाचा : अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

अरुंधती आणि आशुतोषला एकत्र आणण्यासाठी यश सतत प्रयत्न करताना मालिकेत दिसतोय. मात्र, हे करत असताना आता त्याच्या स्वत:च्याच नात्याची घडी विस्कटताना दिसतेय. त्यातच अरुंधती सध्या घरी नाहीये. त्यामुळे अरुंधतीला हे सगळं कळेल तेव्हा ती हे सगळं कसं सावरणार? गौरी खरंच यशला कायमचं सोडून जाणार का? हे पाहणं इन्ट्रेस्टिंग ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी