Bigg Boss 16 : "शिव ठाकरेला माफ करणं ही माझी चूक...", अभिनेता आरोह वेलणकरचं 'ते' ट्विट चर्चेत

मालिका-ए-रोज
Updated Nov 11, 2022 | 19:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 16 : सध्या शिव ठाकरे (Shiv thakre) खूपच चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये (Bigg boss 16) शिव ठाकरे आणि अर्चना गौतममध्ये झालेला राडा एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे. शिव ठाकरेने अर्चना गौतमला घराबाहेर काढल्यानंतर अनेक कलाकार ट्विट करत आहेत. सध्या आरोह वेलणकरचं ट्विट खूप चर्चेत आहे.

aaroh velnakr twitt about Bigg boss 16 contestant shiv thakre
अभिनेता आरोह वेलणकरचं 'ते' ट्विट चर्चेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेता आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत
  • शिव ठाकरेला माफ करणं ही चूक- आरोह वेलणकर
  • अर्चना गौतम आणि शिव ठाकरेमुळे बिग बॉस 16 चर्चेत आहे.

Bigg Boss 16 : सध्या शिव ठाकरे (Shiv thakre) खूपच चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये (Bigg boss 16) शिव ठाकरे आणि अर्चना गौतममध्ये झालेला राडा एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे. शिव ठाकरेने अर्चना गौतमला घराबाहेर काढल्यानंतर अनेक कलाकार ट्विट करत आहेत. सध्या आरोह वेलणकरचं ट्विट खूप चर्चेत आहे. (aaroh velnakr twitt about Bigg boss 16 contestant shiv thakre​)
 

 बिग बॉस 16 (Bigg boss 16) सध्या खूपच चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये शिव ठाकरे (Shiv thakre) आणि अर्चना गौतममध्ये (Archana gautam) झालेला राडा आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलाय. घरात साजिद खान (Sajid Khan) आणि गौरी नागोरीचं भांडण सुरू होतं. यावेळी शिवने या वादात उडी घेतली. शिवपाठोपाठ अर्चनानेही या भांडणात भाग घेतला. हा वाद खूप जास्त झाला. अर्चनाने अचानक शिवचा गळा पकडला. अर्चनाला शिक्षा देण्याचा निर्णय बिग बॉसने शिव ठाकरेवर सोपवला, आणि शिवने अर्चनाला तिच्या कृत्याबद्दल घराबाहेरचा रस्ता दाखवला. या सगळ्यानंतर आता परिस्थितीवर मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी 2 चा स्पर्धक आरोह वेलणकरने केलेलं ट्विट खूप चर्चेत आलेलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

अधिक वाचा : सिद्धांत वीर सूर्यवंशी जिममध्ये वर्कआउट करताना कोसळला

शिव ठाकरेचा गळा अर्चना गौतमने पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अर्चनाला त्याची शिक्षा म्हणून घराबाहेर जावं लागलं. त्यानंतर बिग बॉस मराठी 2 च्या आठवणींना अभिनेत्याने उजाळा दिला. आरोह वेलणकर या अभिनेत्याने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये आरोहने 'शिव ठाकरेला माफ करणं ही माझी चूक होती' असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आरोह वेलणकरचं हे ट्विट सध्या खूपच चर्चेत आहे.  

आरोहने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय, "शिव ठाकरे माझ्याबरोबरही बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये हिंसक झाला होता. त्याने मलाही मारलं होतं. त्याच्या या वर्तणूकीसाठी बिग बॉस त्याला घरातून हाकलतील असं मला वाटलं होतं मात्र तसं घडलं नाही. मी शिवला त्यावेळी माफ करायला नको होतं. शिव ठाकरेला माफ करणं ही माझी चूक होती. मी सुद्धा त्याच्याशी तसंच वागायला हवं होतं." दुसऱ्या सीझनच्यावेळी आरोह आणि शिवमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यावेळी शिवने आरोहवर हात उचलल्याचं आरोहचं म्हणणं आहे. 

अधिक वाचा :  आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero'चा ट्रेलर रिलीज

आरोहच्या या ट्विटने पुन्हा एकदा त्याच्या बिग बॉस मराठी सीझन 2 च्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे आता शिव ठाकरे आणि अर्चना गौतमच्या वादाने वेगळं वळण घेतलं आहे. आता पुढे काय होणार हे लवकरच कळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी