Bigg Boss 16 : सौंदर्या शर्मावर अब्दू रोजिक फिदा, सोशल मीडियावर video Viral

मालिका-ए-रोज
Updated Oct 31, 2022 | 15:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 16 : अलीकडे बिग बॉसचा (Bigg Boss) प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दू रोजिक (Abdu Rozik)सौंदर्या शर्माशी (Soundarya Sharma)जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर तो त्याचा पर्सनल नंबरही शेअर करताना दिसत आहे.

Abdu rozik shared personal number to Soundarya sharma video viral
... आणि अब्दू रोजिकचा तो व्हिडिओ व्हायरल झाला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरात अब्दू रोजिकचा जलवा
  • सोशल मीडियावर अब्दू रोजिकचा व्हिडिओ व्हायरल
  • अब्दू रोजिकच्या व्हायरल व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

Bigg Boss 16 : अलीकडे बिग बॉसचा (Bigg Boss) प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दू रोजिक (Abdu Rozik) सौंदर्या शर्माशी  (Soundarya Sharma) जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर तो त्याचा पर्सनल नंबरही शेअर करताना दिसत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात खूपच धमाल सुरू आहे. गेल्या वीकेंडलाही घरात खूप गोंधळ झाला होता. डेंग्यूमधून बरं झालेल्या सलमान खाननेही त्याच्या स्टाईलमध्ये स्पर्धकांची शाळा घेतली. (Abdu rozik shared personal no to Soundarya sharma bigg boss video viral on social media)

अधिक वाचा :  ब्राझीलचा पुन्हा ‘लेफ्ट टर्न’

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये साजिद खान गौतमच्या विरोधात दिसत आहे. त्याचबरोबर घरातील सदस्यही गौतमच्या विरोधात दिसत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अधिक वाचा : कोहलीच्या रूमचा व्हिडिओ झाला leak, व्हिडिओ पाहून भडकला विराट


त्याचवेळी, या भांडणादरम्यान, अब्दू रोजिकचा (Abdu Rozik) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अब्दू रोजिक आता निम्रित कौर अहलुवालियाला (Nimrit Kaur Ahluwalia) सोडून सौंदर्या शर्माशी (Soundarya Sharma) जवळीक साधताना दिसत आहे. अब्दू सौंदर्याला ब्युटी म्हणून हाक मारत आहे. एवढंच नाही तर अब्दू त्याचा पर्सनल नंबरही शेअर करताना दिसत आहे. दुसरीकडे, गौतम विज अब्दूच्या या कृतीवर नाराज असल्याचं दिसत आहे. आधी निमृत होती आणि आता सौदर्या दिसत आहे असं विधान गौतम विज करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. बिग बॉसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही भरभरून कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हटले आहे, "क्या बात है, छोटा पॅकेट बडा धमाका", दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, "मी फक्त अब्दू रोजिकसाठीच बिग बॉस पाहतो." बाकीचे माइंड गेम खेळत आहेत. तर आणखी एका यूजरने म्हटले आहे, " शहनाजनंतर आता अब्दु रोजिकने मन जिंकले आहे, तो खरा वाटतो, खोटेपणा त्याच्यात नाही". एकूणंच काय तर अब्दू रोजिक बिग बॉसच्या घरातील आवडता सदस्य झालेला आहे. प्रेक्षक त्याचं कौतुक करताना अजिबात थकत नाहीयेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी