Marathi News: "माझी संधी हिरावून घेऊ शकाल पण माझं टॅलेंट नाही..", अभिज्ञा भावेची 'ती' पोस्ट चर्चेत

मालिका-ए-रोज
Updated Sep 25, 2022 | 16:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Marathi News: मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो, व्हिडीओ आणि रील्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.सध्या अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोज आणि कॅप्शनची (Instagram Post) सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

Abhidnya Bhave shares beautful photos in red dress viral on social media
अभिज्ञा भावेची 'ती' पोस्ट चर्चेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिज्ञा भावेनं शेअर केले ग्लॅमरस फोटो
  • अभिज्ञाच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
  • ग्लॅमरस फोटोंसह अभिज्ञाची पोस्टही चर्चेत

Abhidnya Bhave Instagram Post: मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे( Abhidnya Bhave). अभिज्ञा सध्या 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिज्ञाने साकारलेली वल्ली कपटी, लबाड असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप वेगळी आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर  (Instagram Post) आपले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबतच अभिनेत्रीने लिहिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.(Abhidnya Bhave shares beautful photos in red dress viral on social media)

अभिज्ञाने सुंदर अशा लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. अभिज्ञाच्या या हॉट लूकप्रमाणेच तिची पोस्टही खूप चर्चेत आहे. अभिज्ञा नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. चाहते आणि सेलिब्रिटी तिच्या फोटोजना, लूकला भरभरून दाद देत असतात. 

अधिक वाचा : प्रियंकाने सगळ्यांसमोर निकला केलं Lip Kiss

अभिज्ञान लाल रंगाचा वेस्टर्न आउटफिट वेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच गॉर्जिअस दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोंसोबतच तिच्या पोस्टचीही चर्चा सोशल मीडियावर रंगतेय. अभिज्ञाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्ही माझ्या काही संधी हिरावून घेऊ शकता.. माझं नशीब, माझी प्रतिभा हिरावू शकत नाही'. या पोस्टमधून अभिज्ञानाला नेमकं काय म्हणायचं आहे? अभिज्ञाच्या या पोस्टमागचा नेमका अर्थ काय? या सगळ्याचा तिचे चाहते अंदाज लावत आहेत.. अभिज्ञानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी, कलाकारांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी तिने स्वीमसूटमधील फोटो शेअर केले होते. अभिज्ञा तिच्या नवऱ्यासोबत फिरायला गेली होती तेव्हा तिथे तिने ते फोटोशूट केलं होतं. अभिज्ञाने तिचे ते फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले होते. प्रेक्षकांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. 

अधिक वाचा : उर्फी जावेदच्या अतरंगी लूकने डिझायनर्स हैराण

एकूणंच काय तर सध्या अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोप्रमाणेच तिची पोस्टही हॉट आहे त्यामुळे आता नेमकं यामागचं गुपित काय? हे कळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार हे नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी