अभिजीत बिचुकलेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री?

मालिका-ए-रोज
Updated Jun 25, 2019 | 10:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Abhijeet Bichukale: बिग बॉस मराठी२ च्या चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक अभिजीत बिचुकले. याच बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. आता बिचुकलेची पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्रीची चर्चा आहे.

Abhijeet Bichukale
अभिजीत बिचुकले  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात सुरू असलेले वाद आणि त्यानंतर बिग बॉसचा स्पर्धक अभिजीत बिचुकले याला झालेली अटक या सर्वांमुळे बिग बॉस मराठी २ ची चर्चा सर्वत्र जोरदार होत आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, अभिजीत बिचुकले याच्या विरोधातील तक्रार मागे घेत असल्याचं तक्रारदाराने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले दिसणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

खंडणीची तक्रार मागे

अभिजीत बिचुकले याच्याविरोधात फिरोज फटाण या व्यक्तीने खंडणीची तक्रार केली होती. मात्र, आता तक्रारदार फिरोज पठाण यांनी तक्रार मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्याने आता बिचुकलेंना मोठा दिलासा मिळाला असून त्याचा बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. तसेच सोशल मीडियातही याची जोरदार चर्चा रंगल्याचं पहायला मिळत आहे.

कळंबा कारागृहात रवानगी

अभिजीत बिचुकले याची सोमवारी सांयकाळी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. बिचुकले याचा खंडणी प्रकरणात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  शनिवारी रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने बिचुकले याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळच्या सुमारास त्याची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर बिचुकलेला न्यायालयात हजर केलं.

बिचुकले विरोधात एकूण दोन तक्रारी

बिग बॉस मराठी २च्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी थेट बिग बॉसच्या घरातून अटक केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. अभिजीत बिचुकले याला अटक केल्यानंतर सातारा पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं. चेक बाऊन्स प्रकरणात त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला मात्र, दुसऱ्या एका खंडणीच्या प्रकरणात बिचुकलेचा जामीन न्यायालयाने फेटाळला. यामुळे बिचुकलेची रवानगी कारागृहात करण्यात आली. पण आता त्याच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अभिजीत बिचुकलेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री? Description: Abhijeet Bichukale: बिग बॉस मराठी२ च्या चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक अभिजीत बिचुकले. याच बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. आता बिचुकलेची पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्रीची चर्चा आहे.
Loading...
Loading...
Loading...