Breathe 2 Trailer Out: अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल थ्रीलर वेबसीरिजचा trailer Out, अ‍ॅक्शन आणि सस्पेन्सचा तडका

मालिका-ए-रोज
Updated Oct 27, 2022 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Breathe into the shadows trailer: अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) सायकोलॉजिकल थ्रीलर वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज (Breathe 2 Trailer Out) झाला आहे. ही Amazon च्या मोस्ट अवेटेड सिरीजपैकी एक आहे. अ‍ॅक्शन सीक्वेन्सने परिपूर्ण अशी ही वेबसीरिज आहे.

 Abhishek bachchan webseries breathe 2 trailer out
अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिषेक बच्चनच्या सायकोलॉजिकल थ्रीलरचा ट्रेलर रिलीज
  • Breathe :into the shadows चा थ्रीलर रिलीज
  • वेबसीरिजचा वर्ल्ड वाइड प्रीमियर 9 नोव्हेंबर 2022 ला होणार

Breathe 2 Trailer Out: सिनेमांप्रमाणेच वेब सीरिजचही (Web series) ट्रेंडमध्ये आहेत. किंबहुना सिनेमांपेक्षा प्रेक्षकांची वेब सीरिजला जास्त पसंती मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. एखाद्या वेबसीरिजचे 2 किंवा 3 सीझन असतील तर त्यामुळे जास्त धमाल येते. OTT प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या Breathe :into the shadows च्या नव्या सीझनची प्रतीक्षा संपलेली आहे. Breathe 2 चा ट्रेलर रिलीज झालेला आहे. (Abhishek bachchan starrer webseries breathe 2 trailer out)

अधिक वाचा : भेदभाव संपला, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन

या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर अ‍ॅक्शन सीक्वेन्सने भरलेला आहे.  ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे बेरहम जे म्हणजेच अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आधीच्या सीझनमध्ये जिथे त्याने त्याचे काम अपूर्ण ठेवले होते तिथूनच तो पुन्हा आलेला आहे. उरलेल्या 6 पीडितांना पकडण्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जे रिटर्न आलेला आहे. कबीर म्हणजेच अमित साध (Amit sadh) जे ला या सगळ्यात शक्य ती सर्व मदत करताना दिसणार आहे.  


या सायकॉलॉजिकल थ्रीलर सीझनमध्येही तेच कलाकार पुन्हा त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर प्रमुख भूमिकेत आहेत. नवीन कस्तुरिया यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या सीझनचे दिग्दर्शन मयंक शर्माने केले आहे.

अधिक वाचा :  असे दिसेल अयोध्येचे राम मंदिर

अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांनी ही वेबसीरिज एकत्र लिहिलेली आहे. या 8 भागांच्या वेबसीरिजचा वर्ल्ड वाइड प्रीमियर 9 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या सीझनमध्येही अमित साध आणि अभिषेक बच्चन मजेशीर भूमिकेत दिसणार आहेत. अभिनयाच्या बाबतीत ही वेबसीरिज अभिषेक बच्चनसाठी चांगली ठरली आहे. या वेबसीरिजमध्ये अभिषेकने ज्या पद्धतीने काम केले आहे ते वाखाणण्याजोगे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी