मुंबई: टीव्ही अभिनेता आशिष रॉय(tv actor ashish roy) यांचे वयाच्या ५५व्या निधन(passed away) झाले आहे. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या(kidney failure) आजारांनी ग्रस्त होते. यातच त्यांचे निधन झाले. CINTAAचे संयुक्त सचिव अमित बेहल यांनी ही बातमी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी शरीराच्या अनेक भागांमध्ये पाणी भरल्याने त्यांना जुहूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आशिष यांची बहीण कोलकाता येथून मुंबईला पोहोचत आहे त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आशिष यांचे निधन पहाटे पावणेचारच्या सुमारास झाले. रॉय जेथे राहत होते तेथील बिल्डिंगच्या सिक्युरिटीने सांगितले की, आशिष साहेबांचे निधन पावणेचारच्या सुमारास झाले. त्यांचा नोकर धावत तेथे आला आणि त्याने सांगितले की त्यांना उचक्या आल्या आणि ते खाली पडले. त्यांना हेल्थ प्रॉब्लेम सुरू होता. मात्र काल त्यांची तब्येत ठीक होती. आज त्यांचा डायलिसीस होणार होता.
या वर्षी मे महिन्यात आशिष यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना आर्थिक समस्या जाणवत होती आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली होती की त्यांना मदतीचा हात हवाय. स्पॉटबॉयशी बोलताना त्याने सांगितले की माझा डायलिसीस सुरू आहे, माझ्या तब्येतीत विशेष काही सुधारणा नाही. आताही शरीरामद्ये भरपूर पाणी साचले आहे. मला नाही माहीत की मला येथे कधीपर्यंत राहावे लागेल. हॉस्पिटलचे बिल सातत्याने वाढत आहे.
५४व्या वर्षी आशिष रॉय यांना २०१९मध्ये पॅरालिसीस झाला होता. यानंतर त्यांना काम मिळणे बंद झाले होते. त्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या होता. शरीरात पाणी जमा झाल्याने पायांवर सूज आली होती. त्यांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती आणि त्याने सलमान खानकडून मदतीची अपेक्षा ठेवली होती. आशिष यांनी म्हटले होते की आता मला सलमान खानकडून आशा आहेत. मी त्यांच्या फाऊंडेशनBeing Human शी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा मित्र सूरज सलमान खानसोबत काम केले आहे.
आशिष रॉय आपल्या सुंदर अभिनयासाठी ओळखले जात. त्यांनी ससुराल सिमर का, जीनी और जुजू, तू मेरे अगल बगल है तसेच बा बहू और बेबीसारख्या शोजमध्ये काम केले होते.