३० वर्षांनंतर अभिनेता शेखर सुमनचा खुलासा, ‘देख भाई देख’ मालिका का केली? सांगितलं कारण

मालिका-ए-रोज
Updated Apr 03, 2020 | 19:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shekhar Suman On Dekh Bhai Dekh:अभिनेता शेखर सुमनची ‘देख भाई देख’ही मालिका पुन्हा एकदा टिव्हीवर प्रसारित होतेय.शेखर सुमन ही मालिका करण्यापूर्वी आर्थिक संकटात सापडला होता. जाणून घ्या काय म्हणतोय शेखर ३० वर्षांनी

Dekh Bhai Dekh
‘देख भाई देख’ मालिका करण्याचं भावूक कारण – शेखर सुमन 

थोडं पण कामाचं

  • ९० च्या दशकातील प्रसिद्ध विनोदी मालिका 'देख भाई देख' दूरदर्शनवर पुन्हा टेलिकास्ट
  • या मालिकेचं शूटिंग सुरू असतांना शेखर सुमन आर्थिक संकटात असल्याचं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं.
  • मालिकेपूर्वी शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलाचं झालं होतं निधन

मुंबई: ९०च्या दशकातील प्रसिद्ध टिव्ही सीरिअल ‘देख भाई देख’ पुन्हा एकदा दूरदर्शनवर टेलिकास्ट होतेय. ९०च्या दशकातील या प्रसिद्ध मालिकेत शेखर सुमन, फरीदा जलाल, नवीन निश्चल, शम्मी आंटी सारख्या कलाकारांनी काम केलं होतं. शेखर सुमननं सांगितलं की, जेव्हा या मालिकेचं शूटिंग सुरू होतं तेव्हा तो आर्थिक संकटात सापडलेला होता.

Spotboye ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये शेखर सुमननं सांगितलं की, ‘देख भाई देख’चं शूटिंग सुरू असतांना त्याला खूप संकटांचा सामना करावा लागला होता. शेखर सुमननं सांगितलं, ‘मी ३० वर्षांच्या वयात दोन मुलांचा बाप झालो होतो. अशात मला माझ्या कुटुंबियांचं पोट भरायचं होतं.’

शेखर सुमन पुढे सांगतात, त्यावेळी माझा मोठा मुलगा आयुष खूप आजारी झाला होता. काही काळानंतर आम्ही त्याला गमावलं. मी खूप दु:खात होतो. यानंतर मला अभिनय करायची इच्छा नव्हती. पण माझ्याजवळ हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी अभिनय करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love reaches out.

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman) on

टिव्हीमध्ये नव्हतं करायचं काम

शेखर सुमन म्हणतात, ‘माझ्याजवळचे पैसे संपले होते. मला माझं भविष्य संकटात असल्याचं दिसत होतं. मला टिव्हीमध्ये काम करायचं नव्हतं. कारण त्यावेळी चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनी मालिकेत काम करणं चांगलं मानलं जात नव्हतं.’

शेखर सुमन यांनी पुढे सांगितलं, ‘एक दिवस मला अंजू महेंद्रू यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, ते मालिका बनविण्याचं ठरवत आहेत. ही मालिका जया बच्चन प्रोड्यूस करणार होत्या. त्यांनी मला सांगितलं की, मी या मालिकेत लीड हिरोची समीर दिवाणची भूमिका साकारावी.’

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

may i come in plz?

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman) on

मालिकेसाठी मिळाली होती एव्हढी फी

शेखर सुमननं पुढे सांगितलं, ‘मी सुरूवातीला घाबरत होतो की, मालिकेसाठी होकार द्यावा की नाही. मात्र मला पैशांची गरज होती. अशात मी होकार दिला. मी जुहूमध्ये अंजू महेंद्रू यांच्या ऑफिसला गेलो. तिथं मी रात्री ९ वाजता पोहोचलो मला वाटलं १ तासात परत येईल. पण मी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता परतलो.’

शेखर सुमन पुढे म्हणाले, ‘मला एका एपिसोडसाठी पाच हजार रुपये मिळत होते. एका महिन्यात चार एपिसोड टेलिकास्ट होत होते. मात्र एका एपिसोडच्या शूटिंगसाठी सहा ते सात दिवस लागत होते. मला आठवतं माझा ३२वा वाढदिवस मालिकेच्या सेटवर साजरा केला गेला होता.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी