Shivaji Satam | नवी दिल्ली : टीव्ही पासून बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे दिग्गज अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) मागील काही कालावधीपासून अभिनयाच्या दुनियेतून लांब राहिले आहेत. दरम्यान आज देखील प्रेक्षकवर्ग त्यांना एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) या नावाने ओळखतात. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी जवळपास २३ वर्षांपर्यंत टीव्ही शो सीआयडी (CID) त्यांचे पात्र अतिशय प्रामाणिकपणे सांभाळले होते. याचमुळे त्यांनी प्रत्येक घरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. (Actor Shivaji Satam who is playing the lead role in the TV show CID is currently finding work).
लोकप्रिय अभिनते शिवाजी यांनी नायक, वास्तव आणि सुर्यवंशी' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांना स्वतःचे चाहचे होण्यास भाग पाडले होते. मात्र, त्याची योग्य ओळख सीआयडीकडूनच (CID) झाली. मात्र, इंडस्ट्रीत बराच काळ घालवल्यानंतरही शिवाजी आज कामाच्या शोधात आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी काम न मिळण्याच्या त्यांच्या अडचणी आणि वेदना सांगितल्या आहेत.
शिवाजी यांनी म्हटले की, "मला अफाट काम मिळत आहे असे मी म्हणू शकत नाही. जर काम नसेल तर नाही. मला जी काही छोटी-छोटी पात्रं मिळत आहेत, तीही फारशी खास नाहीत. मी मराठी रंगभूमीचा अभिनेता आहे. माझ्या करिअरमध्ये मी फक्त मला आवडलेल्या प्रोजेक्ट्ससाठी काम केले आहे. माझ्यासाठी हे खूप दुःखी आहे की आज अधिक शक्तिशाली पात्रे लिहिली जात नाहीत आणि हे सर्व बाजूंनी नुकसान आहे."
"काम न मिळाल्याने मला घरी बसून कंटाळा आला आहे. एक कलाकार असल्याने मला माझ्या कामाची खूप आठवण येते. आता जे थोडे काम मिळते, तेही फक्त पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिका आहेत. आता मला ते करायचे नाही, कारण मी गेल्या २० वर्षांपासून अशा भूमिका करत आलो आहे." असे प्रसिध्द अभिनेते शिवाजी साटम यांनी अधिक सांगितले. टीव्ही शो सीआयडीवर प्रश्न विचारला असता शिवाजी म्हणाले की, हा शो पुन्हा सुरू झाला तर ते करणार्यांच्या यादीत ते पहिले अभिनेते आहेत. ते म्हणाले, "मला एसीपी प्रद्युम्नची भूमिका करून कंटाळा येत नाही, उलट घरी राहून कंटाळा आला आहे."