'या' अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Asha Negi Topless Photo:  अभिनेत्री आशा नेगी सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव असते. अलीकडेच तिने आपला टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे. 

asha negi
'या' अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री आशा नेगीने टॉपलेस फोटो सोशल मीडियावर केला शेअर 
  • आशा नेगीने आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये केलं आहे काम 
  • आशा नेगीने नुकतंच लुडो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे

मुंबई: सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि नुकतीच लूडो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आशा नेगी (asha negi) ही सोशल मीडियावर (Social Media) बरीच अ‍ॅक्टिव्ह असते आणि वारंवार स्वतःशी संबंधित पोस्ट्स शेअर करत असते. आशा सध्या तिच्या मित्र-मैत्रिणींसमवेत हिमाचल प्रदेश मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि सतत तेथील सुंदर फोटो शेअर करत आहेत. या सर्वांच्या दरम्यान तिने अलीकडेच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे.

आशाने अलीकडेच एक असा फोटो शेअर केला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती टॉपलेस (Topless) आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये  आरशासमोर टॉवेल्समधील टॉपलेस फोटो तिने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना आशाने लिहिले की, ती हा फोटो नंतर डिलीट करु शकते. आशा नेगीचा हा फोटो सोशल मीडिया सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे आणि त्यावर सतत कमेंट देखील करत आहेत. तसंच अभिनेत्रीचे कौतुक सुद्धा करत आहेत.

आशा नेगीच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री किश्चर मर्चंटने 'हॉटनेस' अशी कमेंट केली आहे. या फोटोवर कमेंट करताना अभिनेत्री रिद्धि डोगरा हिने लिहिले, 'लव'. तर आशाचे चाहते म्हणतात की तिला हा फोटो डिलिट करण्याची गरज नाही, कारण तो खूपच सुंदर आहे.

आशा नेगीने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये सपनों से भरे नैना, बड़े अच्छे लगते हैं, पवित्र रिश्ता, शुभ विवाह, पुनर्विवाह, सपने सुहाने लड़कपन के, कुबूल है, एक मुट्ठी आसमान, कुमकुम भाग्य आणि कुछ तो है तेरे मेरे दरमियां या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 आणि नच बलिये 6 या रिअॅलिटी शोमध्ये सुद्धा दिसली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर आशा नेगी नुकत्याच रिलीज झालेल्या अनुराग बसूच्या मल्टीस्टारर फिल्म लूडोमध्ये दिसली आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, राजकुमार राव, सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख हे मुख्य भूमिकेत आहेत. आशाचा हा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये तिच्या कामाला पसंती दिली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी