‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला वाटतेय तिच्या नवऱ्याची भीती, बघा काय करतो

मालिका-ए-रोज
Updated May 20, 2020 | 19:00 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Kratika Sengar Husband Nikitin Dheer Aggression: टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगरनं एक खुलासा केलाय. नवऱ्याची भिती वाटत असल्याचं तिनं सांगितलंय, जाणून घ्या काय घडलंय असं...

kratika sengar and nikitin dheer
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला वाटतेय तिच्या नवऱ्याची भिती  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री कृतिका सेंगर आणि निकितिन धीर प्रसिद्ध सेलिब्रेटी कपल्स पैकी एक आहे.
  • कृतिका आणि निकितिनचं झालं होतं अरेंज मॅरेज
  • दोघांची जोडी बेस्ट रिअल लाईक सेलिब्रेटी कपल्स पैकी एक मानली जाते.

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगर आणि बॉलिवूड अभिनेता निकितिन धीर प्रसिद्ध सेलिब्रेटी कपल्स पैकी एक आहे. कृतिका आणि निकितिन धीरची केमेस्ट्री नेहमीच फॅन्सना आवडत आलेली आहे. दोघांना छोट्या पडद्यावरील बेस्ट रिअल लाईफ कपल म्हणून ओळखलं जातं. खूप कमी लोकांना माहितीय की, कृतिका सेंगर आणि निकितिन धीरचं लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज झालं होतं. २०१४ साली दोघांचं लग्न झालं आणि सध्या हे कपल आपलं वैवाहिक आयुष्य एंजॉय करत आहेत.

आता नुकताच अभिनेत्री कृतिका सेंगर एक इंटरव्यू दिला आहे. या इंटरव्यूमध्ये तिनं आपल्या स्ट्रगल डेज बद्दल आणि तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं. कसौटी जिंदगी पासून तर झांशीची राणीपर्यंत मालिकांची संपूर्ण जर्नी तिनं सांगितली. या दरम्यान कृतिकानं तिचे सासरे पंकज धीर सोबतच तिचं असलेलं बॉन्डिंग आणि नवरा निकितिन धीरशी निगडित काही गोष्टी सांगितल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kratika S Dheer (@itsmekratika) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kratika S Dheer (@itsmekratika) on

कृतिका सेंगरनं खुलासा केला की, जेव्हा तिचं लग्न व्हायचं होतं, तेव्हा ती आपल्या इच्छेनं लढायची आणि स्वत:ची गोष्ट निकितिनकडून करवून घ्यायची. मात्र निकितिन सोबत लग्न झाल्यानंतर आता असं नाहीय, कारण आता तो गिव्ह अप करत नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is a usual scene at home, especially when @nikitindheer comes awfully hungry from his shoot..

A post shared by Kratika S Dheer (@itsmekratika) on

टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगर सांगते की, जेव्हा तिच्या नवऱ्याला निकितिन धीरला राग येतो तेव्हा ती घाबरून जाते. त्याच्या लूकवरूनच कळतं की, त्याला कुठली तरी गोष्ट आवडलेली नाही. मी त्याला घाबरते, अनेकदा जेव्हा मी आपल्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं ऐकत नाही, तेव्हा ते सगळे मला तुझं नाव निकितिनला सांगू, असं म्हणून घाबरवतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी