नच बलिये ९च्या सेटवर जखमी झाली उर्वशी ढोलकिया, व्हायरल झाला व्हिडिओ

मालिका-ए-रोज
Updated Aug 12, 2019 | 20:47 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

उर्वशी ढोलकियाने नच बलिए ९च्या डान्स प्रॅक्टिसदरम्यानचे व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता की ती कशी जखमी झाली.

nach baliye
नच बलिये 

थोडं पण कामाचं

  • २०१५मध्ये उर्वशी आणि अनुज सचदेव यांच्यातील अफेयरची चर्चा रंगली
  • आता नच बलिएमध्ये उर्वशी आणि अनुजने एक्स कपल म्हणून सहभाग घेतला होता
  • नच बलिएच्या डान्स प्रॅक्टिसदरम्यान उर्वशी झाली जखमी

मुंबई: रिअॅलिटी शो नच बलिए ९ सुरू झाले आहे. शोमध्ये स्पर्धक म्हणून दाखल झालेले उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा प्रेक्षकांच्या पसंतीपैकी एक आहेत. नुकताच उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवाने डान्स प्रॉपर्टी म्हणून ट्रॉलीचा वापर केला होता. या सरावादरम्यान उर्वशीला जखम झाली. उर्वशी ढोलकियाने नच बलिए ९च्या डान्स प्रॅक्टिसदरम्यानचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तुम्ही पाहू शकता की उर्वशी आपल्या प्रॅक्टिसदरम्यान अनुज सचदेवा चांगलाच घाम गाळत आहे. प्रॅक्टिसदरम्यान उर्वशी जखमी झाली. यावेळी तो त्रास सहन न झाल्यानेे ती जमिनीवरच बसते. बराच वेळ तिला उठकाही येत नाही. दुसऱ्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता ती अनुज सचदेवा ट्रॉली घेऊन उर्वशी ढोलकियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा ट्रॉलीमधून बॉडी बाहेर काढताना ती जखमी झाली. 

उर्वशी नेहमी बिहाईन्ड द सीन्स व्हिडिओ शेअर करत असते. यात तिच्या परफेक्ट परफॉर्मन्स बाबतचा खरेपणा दिसतो. ती म्हणतेय, विचार कर असाल मी जमिनीवर का  बसली आहे. दुसरा व्हिडिओ पाहा ज्यानंतर तुम्ही विचार कराल की ग्लॅमर जगताच्या पाठीमागे किती सच्चेपणा असतो. ज्या त्रासाने आम्ही जात असतो त्यामुळे परफॉर्मन्स चांगला करण्यास आम्हाला प्रेरणा मिळते. हे स्टंट करणे सोपे नाही मात्र याची किंमत मोजावी लागते. 

नच बलिए ९मध्ये उर्वशी त्या स्पर्धकांपैकी एक आहे जिने आपल्या एक्स लव्हरसोबत सहभाग घेतला आहे. उर्वशीने आपल्या तीन अटींसह सहभागी होण्यासाठी तयारी दाखवली. उर्वशीच्या मते पहिली अट म्हणजे भले आम्ही दोघे एकत्र परफॉर्मन्स करत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही आताही रिलेशनशिपमध्ये आहोत. उर्वशीची दुसरी अट म्हणजे आम्ही एकमेकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करू. तसेच पर्सनल लाईफमध्ये दखल देतील. तिसरी अट म्हणजे दोघेही स्क्रीन्सवर तसेच राहतील जसे ते रिअल लाईफमध्ये आहेत. 

२०१५मध्ये उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेव यांच्या अफेयरमुळे खूप चर्चेत होते. मात्र लवकरच हे कलप वेगळे झाले. असं म्हणथात अनुजच्या कुटुंबियांनी उर्वशीला ५ वर्षे मोठी, घटस्फोटित आणि २ मुलांची आई असल्याने तिला स्वीकारले नाही. या कारणामुळे त्या दोघांना वेगळे व्हावे लागले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...