Neeru Bajwa Pregent : आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. पण जेव्हा डॉक्टर त्या महिलेला सांगतील की ती कधीच आई होऊ शकणार नाही, तेव्हा तिला किती त्रास झाला असेल याची कल्पना करा. असाच काहीसा प्रकार पंजाबची प्रसिद्ध अभिनेत्री नीरू बाजवासोबत घडला. तिचे आई होण्याचे स्वप्नही क्षणभर भंगले, पण नंतर असा करिश्मा घडला... नीरू बाजवा तीन मुलींची आई आहे. ती आता चौथ्यांदा आई होणार आहे. (actress Neeru Bajwa is going to become a mother for the fourth time, flaunted baby bump!)
नीरू बाजवा पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. नीरू एक अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखली जाते. नीरू बाजवा हिला तीन अतिशय सुंदर मुली आहेत आणि आता ती चौथ्यांदा गरोदर आहे. नीरू तिच्या गरोदरपणाच्या टप्प्याचा मनमुराद आनंद घेत आहे आणि यावेळी ती खूप आनंदी आहे. पण नीरू बाजवाच्या आनंदाचे कारण खास का आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
नीरूने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटोंचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आनंदाने तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते तिचे अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत. पण या कथेतही एक ट्विस्ट आहे. नीरू बाजवाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या आगामी प्रोजेक्ट ब्यूटीफुल बिल्लोचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये नीरू गरोदर आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले – बिल्लो आई होणार आहे. बिल्लोचे अभिनंदन करण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी ZEE5 वर या. नीरू बाजवाच्या या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. अभिनेत्री खरोखर गर्भवती आहे की तिच्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन आहे हे चाहत्यांना समजू शकत नाही. बरं, खरं काय, ते लवकरच कळेल.
तीन मुलांची आई नीरू बाजवा 41 वर्षांची आहे. पण ज्या पद्धतीने तिने स्वत:ला फिट ठेवले आहे. त्यासाठी तिचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी पडेल. ती तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेसने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.