Nikki Tamboli Photos: बिग बॉस १४ मधील सर्वात हॉट स्पर्धक, अभिनेत्री निक्की तांबोळी 

Nikki Tamboli Bigg Boss 14 contestant Facts: अभिनेत्री निक्की तांबोळी ही खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. पाहा सोशल मीडियावरील तिचे असेच काही बोल्ड फोटो. 

actress nikki tamboli is the hottest contestant of bigg boss 14 see her bold photos
अभिनेत्री निक्की तांबोळी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस-14 ची सर्वात हॉट स्पर्धक असून तिने आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.
  • अभिनेत्री निक्की तांबोळीने अवघ्या २४व्या वर्षीच बिग बॉसच्या घरात घेतलीय एंट्री 
  • सोशल मीडियावर निक्कीचे लाखोंच्या घरात फॅन्स 

मुंबई: अभिनेत्री निक्की तांबोळीने शनिवारी बिग बॉस-14 मध्ये एंट्री केली आहे. या प्रीमियरमध्ये बिग बॉस 14 ची दुसरी स्पर्धक म्हणून निक्की तांबोळी हिने प्रवेश केला आहे. बिग बॉस-14 च्या स्टेजवर निक्की तांबोळीने अतिशय सुंदर पद्धतीने नृत्य सादर केले. पहिल्याच दिवशी निक्की तांबोळीने हे सिद्ध केले की ती या मोसमातील सर्वात स्ट्रॉंग स्पर्धक असणार आहे. वास्तविक जीवनात निक्की तांबोळी खूप बोल्ड आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास आपल्याला हे नक्कीच जाणवेल. 

बिग बॉस-14 मध्ये प्रवेश करताना तिने स्पष्ट केलं की, ती अविवाहित आहे. निक्की तांबोळी ही फॅशनच्या बाबतीत खूपच अपडेटेड आहे. निकी बर्‍याचदा तिच्या सोशल मीडिया हँडलवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते. इंडियन आऊटफिटपासून स्विमसूटपर्यंत ती सारं काही अगदी लिलया कॅरी करते. निक्की तांबोळीच्या चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड लूक आवडतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Embrace the imperfections ✨⚡️ #birthdaymood #stayhome #staysafe #chillvibes

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli) on

निक्कीचे वडील एक हे व्यावसायिक आहेत. तर तिची आई  गृहिणी आहे. निक्की तांबोळी इंस्टाग्रामवर बरीच लोकप्रिय आहे आणि बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या आई-वडिलांसह देखील फोटो शेअर करते. इंस्टाग्रामवर निक्कीचे ४ लाख ४१ हजार फॉलोअर्स आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#random#beachvibes#goodenergy✨ #positivevibesonly#befree#achieveyourdream#trustgodsplanandtiming

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli) on

२४ वर्षीय निक्की तांबोळी हिने अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. निक्की ही मूळची महाराष्ट्रीयन असून ती  औरंगाबादची आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yess, it’s hard to be this adorable ‍♀️

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli) on

निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. यानंतर ती टीव्ही जाहीरातींमध्ये देखील झळकली आहे. निक्कीने तेलगू चित्रपट कांचना 3 मध्ये देखील अभिनय केला होता. दिग्दर्शक राघव लॉरेन्सचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामुळे आता ही बोल्ड अभिनेत्री बिग बॉसच्या घरात कशी राहते हे लवकरच सगळ्यांना समजणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी