अभिनेत्री रश्मी देसाईचा गुलाबी बिकिनीतील हॉट लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ 

Rashami Desai swimming pool bikini photoshoot: अभिनेत्री रश्मी देसाई हिने तिचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

rashami desai bikini photoshoot
अभिनेत्री रश्मी देसाईचा गुलाबी बिकिनीतील हॉट लूक  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • रश्मी देसाईने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  • हे फोटो इंस्टाग्रामवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत
  • अभिनेत्री रश्मी देसाई ही नेहमीच तिच्या लूकवर प्रयोग करून चाहत्यांना चकित करते

मुंबई: सेलिब्रिटी बरेचदा आपले सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करतात जे कधीकधी व्हायरल होत असतात. अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashami Desai) नुकतेच शेअर केलेले फोटो देखील आता अशेच व्हायरल होत आहेत. रश्मी देसाई हिने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी तिच्या 3.8 दशलक्ष चाहत्यांना इन्स्टाग्रामवर अक्षरश: वेड लावलं आहे. अभिनेत्री रश्मी देसाई अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करून चाहत्यांना आश्चर्यचकित करते. नव्या फोटोमध्ये रश्मी देसाई बिकीनीमध्ये आपली टोन्ड बॉडीची फ्लॉंट (Bikini photoshoot) करताना दिसत आहे. तिच्या या सुपर हॉट फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. 

गेल्या काही आठवड्यांपासून रश्मी देसाई तिच्या फोटोशूटचे काही उत्तम फोटो चाहत्यांसह शेअर करत आहेत. आता तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रश्मी देसाईने गुलाबी रंगाची बिकिनी आणि पांढरा पारदर्शक टॉप घातला आहे. या कपड्यावर अभिनेत्रीने कमी मेकअप केला आहे आणि लाल लिपस्टिक लावली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सेलिब्रिटी समुद्रकिनारी सुट्टी एन्जॉय करत असल्याचे फोटो शेअर करत आहेत आणि हे लक्षात घेऊन रश्मीनेही आपले फोटो शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, 'गो विथ का फ्लो'. या फोटोंमध्ये रश्मी पूलमध्ये वॉटर बेबी लूक देतानाही दिसली आहे.

बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिने काही दिवसांपूर्वीच आपली आवडती कार खरेदी केलं आहे. ही कार खरेदी करण्याचं तिचं स्वप्न अखेर तिने पूर्ण केलं आहे. रश्मीने तिची आवडती रेंज रोव्हर कार खरेदी केली असून त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रश्मी तिच्या कारच्या मागील सीटवर बसून चहा आणि पावसाचा आनंद घेताना दिसली होती. रश्मी देसाई ही बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. त्यानंतर ती नागीन 4 मध्ये दिसली. नागिन 4 मध्ये रश्मीने शलाखाची नकारात्मक भूमिका साकारली होती. लॉकडाऊन दरम्यान ‘तमस’ ही तिची शॉर्टफिल्म देखील रिलीज झाली होती. (Rashami Desai bikini photoshoot)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी