Kiran Mane update: राजकीय भूमिका घेतल्यानं 'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण मानेंना काढल्याचा आरोप, सोशल मीडियावर चाहते आक्रमक

मालिका-ए-रोज
Updated Jan 14, 2022 | 19:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kiran Mane Update : मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी राजकीय भूमिका मांडल्यानं मालिकेतून डच्चू देण्यात आल्याचा आरोप स्वत: किरण माने यांनी केलाय. तर आता किरण माने यांच्या या प्रकरणावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

 Kiran Mane was removed from the series 'Mulgi Jhali Ho'
राजकीय टिप्पणी केल्यानं .... मानेंचा पाटीलपणा गेला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांची हकालपट्टी
  • राजकीय भूमिका मांडल्यानं मालिकेतून काढण्यात आल्याचा किरण माने यांचा आरोप
  • किरण माने प्रकरणावरून राजकीय नेत्यांचं एकमेकांवर टीकास्त्र


Kiran Mane update : किरण माने प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. चित्रपट आणि कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटीलयांनी किरण माने यांना मालिकेत पुन्हा न घेतल्यास मालिकेचे पुढचे चित्रिकरण होऊ देणारनाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. 

किरण माने यांच्या आरोपानंतर  राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. कॉग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट करत या गोष्टीचा निषेध केला आहे.  'किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. ' असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारणारा किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले गेले.' असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. 

तर भाजपाचे प्रवक्ते राम कदम (ram kadam )यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आतापर्यंत अनेकांनी केंद्र सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 
अपयश झाकण्यासाठी अशा खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागत असल्याचं राम कदम यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 


दरम्यान, स्मॉल स्क्रीनवरील  मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेत किरण माने विलास पाटीलविलास पाटील ही व्यक्तिरेखा अभिनेता किरण माने साकारत होते. किरण माने सोशल मीडियावर सक्रीय असतात. वेगवेगळ्या विषयांवर ते स्वत:चं मत कायम परखडपणे मांडत असतात. सोशल मीडियावर कायम ते काहीना काही पोस्ट करत असतात. त्यांची राजकीय भूमिकाही त्यांनी सोशल मीडियावर अगदी ठामपणे मांडली आहे. आणि म्हणूनच त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. 

मालिकेतून डच्चू देण्यात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते,  ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे

kiran mane post: आत्महत्या करण्याशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत  नाहीत; अभिनेता किरण मानेची पोस्ट व्हायरल - mulgi zali ho actor kiran mane  facebook post viral on ...

आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. वाहिनीकडून मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता हा सारा गेम टीआरपीसाठी आहे की यामागे आणखी काही धोरणं आहेत हे लवकरच कळेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी