Amruta Fadanvis : "कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे गाणं ऐकताच उद्धवजींचा चेहरा डोळ्यासमोर येतो", म्हणाल्या अमृता फडणवीस

मालिका-ए-रोज
Updated Aug 05, 2022 | 19:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amruta Fadanvis in Bas Bai Bas chat show : 'बस बाई बस' हा नवाकोरा चॅट शो झी मराठीवर सुरू झालेला आहे. अभिनेता सुबोध भावे ( Subodh Bhave ) या शोचं सूत्रसंचालन करत आहे. या आठवड्यात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या शोमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचा एक प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Amruta Fadanvis talk about Uddhav Thackeray in marathi chat reality show
अमृता फडणवीसांची "बस बाई बस" रिएलिटी शोमध्ये हजेरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'बस बाई बस'मध्ये अमृता फडणवीसांची हजेरी
  • राजकीय आणि खासगी आयुष्यावर केलं भाष्य
  • "... आणि उद्धवजींचा चेहरा डोळ्यासमोर येतो-अमृता फडणवीस"

Amruta Fadanvis in Bas Bai Bas chat show : 'बस बाई बस' हा नवाकोरा चॅट शो झी मराठीवर सुरू झालेला आहे. अभिनेता सुबोध भावे ( Subodh Bhave ) या शोचं सूत्रसंचालन करत आहे. या चॅट शोची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कतृत्व गाजवलेल्या, उंच भरारी घेतलेल्या महिला या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. पहिल्या भागत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांचा हजरजबाबीपणा, त्यांची उत्तर ऐकून साऱ्यांचीच बोलती बंद झाल्याचं आपण पाहिलं. आता या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) 'बस बाई बस'मध्ये हजेरी लावणार आहेत. ( Amruta Fadanvis talk about Uddhav Thackeray in marathi chat reality show )

अधिक वाचा : दिशा पटनीचा समुद्र किनारी किलर लूक

अमृता फडणवीसांचे वेगवेगळे प्रोमो सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. राजकीय आणि खासगी आयुष्यावर त्या भाष्य करणार हे या प्रोमोंमधून स्पष्ट दिसत आहे. मग ते प्लास्टिक सर्जरी केली आहे का यावरचं उत्तर असो किंवा खुमासदारपणे सध्याच्या परिस्थितीवर केलेलं भाष्य असो.


सध्या त्यांचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना एक गाणं ऐकवण्यात आलेलं आहे, आणि ते गाणं 
ऐकताच कोणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो हे त्यांनी सांगायचं आहे. यावेळी "कशी नशिबाने थट्टा आज मांडली" हे गाणं अमृता फडणवीस यांनी ऐकवताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच उत्तर दिलेले आहे. त्या म्हणाल्या, " उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला. "त्यांच्या या उत्तरामुळे त्या ट्रोलसुद्धा झालेल्या आहेत. 

अधिक वाचा : आइस्क्रीम खाताना इराणी महिलेने  केले असं काही

युजर्स त्यांच्या या उत्तरावर नाराज झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे "बस बाई बस" या शोमध्ये अमृता फडणवीस राजकीय आणि पर्सनल आयुष्याबाबत बोलताना दिसणार आहे.  एकंदरीतच अमृता यांच्या खुमासदार उत्तरांमुळे हा भाग नक्कीच रंगतदार होणार असं म्हणायला हरकत नाही. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी