Anita Date Back to Small screen : 'त्या'फोटोमागचं रहस्य उलगडलं, 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतून अनिता दातेचं पुनरागमन

मालिका-ए-रोज
Updated Jul 11, 2022 | 17:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Anita Date Back to Small screen : " मी कुटून राहीली, माझ्या नवऱ्याची बायको" असं म्हणत प्रेक्षकांना आपलंस करणारी अनिता दाते तब्बल 2 वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर परत येत आहे. नवा गडी, नवं राज्य या मालिकेतून अनिता दाते प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

Anita Date returns on small screen  from 'Nawa Gadi Nawa Rajya' serial
अनिता दाते फोटातून प्रेक्षकांना भेटायला येणार!!  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री अनिता दातेचे स्मॉल स्क्रीनवर पुनरागमन
  • 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून अनिता दाते घराघरात पोहोचली

Anita Date Back to Small screen : " मी कुटून राहीली, माझ्या नवऱ्याची बायको" असं म्हणत प्रेक्षकांना आपलंस करणारी अनिता दाते तब्बल 2 वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर परत येत आहे. यावेळी एका वेगळ्या आणि अनोख्या ढंगात ती प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दाते हिचा हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटो सोबत 'जो आवडतो सर्वांना' असं कॅप्शन देखील देण्यात आलं होतं, या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतरसेलिब्रिटींना देखील प्रश्न पडला होता की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?. मात्र, अखेर हा फोटो शेअर करण्यामागचं खरं कारण आता समोर आलेले आहे.  नुकताच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. 'नवा गडी नवं राज्य'असं या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दातेस्मॉल स्क्रीनवर पुनरागमन करत आहे.

अधिक वाचा : श्रावणात उपवासादरम्यान जरूर हा हे पदार्थ, लठ्ठपणा होईल दूर

या मालिकेत अनिता दाते हिचं पात्र या जगात नसल्याचे दाखवण्यात आले आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एंट्री घेत आहे. या मालिकेत अनिता दाते रमाच्या भूमिकेत दिसणार असून आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण करतेय.  तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसेल.  


माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेनंतर २ वर्षांनी अभिनेत्री अनिता दाते प्रेक्षकांना भेटायला येत आहे.'नवा गाडी नवं राज्य' या मालिकेतून एका नवीन भूमिकेत अनिताला तिचे चाहते पाहू शकतील.

अधिक वाचा : मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अनिता म्हणाली, "माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका नंतर आता रमा या नवीन भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. रमा हे पात्र मालिकेत हयात नाही आहे पण तरी देखल या पात्रामुळे मालिकेला एक रंजक वळण येणार आहे. त्यामुळे रमा साकारताना मला खूप मजा येते आहे. प्रेक्षकांना राधिका सारखीच रमा देखील खूप आवडेल अशी मला खात्री आहे."

तेव्हा आता अनिता आणि पल्लवी एकत्र काय धमाल करतात आणि प्रेक्षकांना अनिता दातेची नवी भूमिका आवडणार का याचीच उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी