Junooniyat टीव्ही मालिकेच्या सेटवर झाला अंकित गुप्ताचा अपघात

मालिका-ए-रोज
Updated Apr 16, 2023 | 19:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

अंकित गुप्ताच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. बिग बॉस 16 मध्ये दिसलेला अभिनेता अंकित गुप्ता सध्या टीव्ही शो जुनूनियतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शोच्या शूटिंगदरम्यान अंकित गुप्तासोबत मोठा अपघात झाला.

Ankit Gupta an accident on sets of Junooniyat TV serial
Junooniyat टीव्ही मालिकेच्या सेटवर झाला अंकित गुप्ताचा अपघात  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अंकित गुप्ता जुनूनियातच्या सेटवर जखमी झाला आहे.
  • खुद्द अंकित गुप्ताने त्याच्या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा दिला
  • अंकित गुप्ता अनेक शोमध्ये दिसला आहे

Ankit Gupta: अंकित गुप्ताच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. बिग बॉस 16 मध्ये दिसलेला अभिनेता अंकित गुप्ता सध्या टीव्ही शो जुनूनियतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शोच्या शूटिंगदरम्यान अंकित गुप्तासोबत मोठा अपघात झाला. ताज्या अपडेटनुसार, अंकित गुप्ता जुनूनियातच्या सेटवर जखमी झाला आहे. (Ankit Gupta an accident on sets of Junooniyat TV serial)

एका रिपोर्टनुसार खुद्द अंकित गुप्ताने त्याच्या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेबद्दल बोलताना अंकित म्हणाला, 'अभिनयामध्ये जोखीम घेणे सहाजिक असते आणि दुखापत होणे हा त्याचा एक भाग आहे. मी सीनमध्ये पूर्णपणे तल्लीन झालो होतो आणि मला हे समजले नाही की मी काय चूक केली ज्यामुळे मला दुखापत झाली. माझ्या टीमने वेळीच माझी चांगली काळजी घेतली आणि मला योग्य मदत दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.'

अधिक वाचा: Gangster Web Series: गुन्हेगारी जगताचे निर्भय सत्य दाखवते गॅंगस्टरच्या जीवनावर बनलेल्या या वेब सिरीज

या मालिकेत अंकित गुप्तासोबत गौतम सिंग विज आणि नेहा राणा मुख्य भूमिकेत आहेत. जखमी झाल्यानंतरही अंकितने शूटिंग सुरू ठेवले आहे. अंकित म्हणाला, “प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा आपल्याला दुखापतींसमोर काही नाही. माझा ठाम विश्वास आहे की हा कार्यक्रम चालूच राहिला पाहिजे आणि आगामी भागांमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.'

अधिक वाचा: Femina Miss India 2023 Winner: दिल्लीची श्रेया पूजा ठरली उपविजेती, सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव

आत्तापर्यंत अंकित गुप्ता अनेक शोमध्ये दिसला आहे. बिग बॉस 16 व्यतिरिक्त तो उडियान, जुनूनियत, सद्दा हक, बेगुसराय आणि कुंडली भाग्य या चित्रपटात दिसला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी