Ankita and Vicky Jain Marriage:अंकिता लोखंडे 2 दिवसांनी होणार वधू, जाणून घ्या लग्नाच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती

मालिका-ए-रोज
Updated Dec 12, 2021 | 17:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ankita and Vicky Jain Marriage update: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झालीय. आज मेहेंदी आणि उद्या हळदी समारंभ होणार आहे.

Ankita Lokhande and Vicky jain wedding update
अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा लग्नसोहळा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं 14 डिसेंबरला होणार शुभमंगल
  • ग्रॅण्ड हयातमध्ये लग्न होणार असल्याची माहिती
  • आज मेहेंदी आणि 13 तारखेला हळदी समारंभ

Ankita and Vicky Jain Marriage update: बॉलिवूड इंडस्ट्रीतील लग्नाचा सिझन अजून संपलेला नाही. 2021 सालातील सर्वात भव्य विवाहसोहळा पार पडला.विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न झाले आहे. पण वर्ष सरत असताना आणखी एक मोठे लग्न जवळ आले आहे. टीव्ही जगतात मोठं नाव बनलेली अंकिता लोखंडे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 14 डिसेंबरला अंकिता आणि विकी जैनचं लग्न होणार आहे. 


अंकिता-विक्कीच्या लग्नाचे तपशील 


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हे जोडपे १४ डिसेंबरला लग्न करणार आहेत. दोघांचे लग्न ग्रँड हयात येथे होणार आहे. 12 डिसेंबर म्हणजे आज मेहेंदी सोहळा होणार आहे. संध्याकाळी एंगेजमेंट होईल, त्यानंतर 13 तारखेला यलो थीम सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती आहे, त्यासोबतच हळदी समारंभही उद्याच होणार आहे. यासोबतच इंडो-वेस्टर्न म्युझिकने रंगणार संगीत सोहळा १३ तारखेलाच होणार आहे. विकी आणि अंकिता लोखंडे 14 तारखेला लग्न करणार आहेत. दोघांचा विवाह महाराष्ट्रीय परंपरेनुसार होणार आहे. लग्नाची थीम रॉयल ट्रॅडिशनल स्प्लेंडर आहे. 14 तारखेला लग्नानंतरच संध्याकाळी रिसेप्शन पार्टी आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची तयारी सुरू होती. पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे आता तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

लग्नाच्या वेळी अंकिताला झाली होती दुखापत

संगीत समारंभाचा सराव करताना अंकिता लोखंडेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची वाईट बातमी समोर आली होती. ती आता बरी होत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ती व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. आता ती बरी असल्याचं समजतंय. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी