Ankita lokhande : अंकिता लोखंडेची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात, थाटामाटात साजरा केला सण

मालिका-ए-रोज
Updated Jan 15, 2022 | 18:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ankita lokhande : अंकिता लोखंडेची लग्नानंतरची ही पहिली मकरसंक्रांत आहे. हलव्याचे दागिने घालून अभिनेत्रीने हा सण साजरा केला आहे.

Ankita Lokhande's first Makar Sankranti after marriage
अंकिता लोखंडेची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंकिता लोखंडेने साजरी केली पहिली मकरसंक्रांत
  • लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत दणक्यात साजरी
  • भरजरी पैठणी, नथीचा नखरा, आणि अंकिताचं सौंदर्य

Ankita Lokhande First Makar Sankranti After Marriage: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) नुकतेच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत  (Vicky Jain) लग्न केले. अंकिता लोखंडेची लग्नानंतरची ही पहिली मकरसंक्रांत (Makar Sankaranti) आहे. अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande First Makar Sankranti) नटून-थटून कुटुंबीयांसोबत हा सण साजरा केला. ज्याचे सुंदर फोटो तिने रीलच्या रुपात चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या व्हिडिओमध्ये अंकिता दागिन्यांनी सजवलेले पतंग उडवताना आणि धनुष्यबाण चालवताना दिसत आहे. अंकिता लोखंडे हिने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. फोटोंमध्ये कुटुंबासोबत सुंदर पोज देणारी अंकिताचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अंकिता लोखंडेच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने पैठणीसरीसोबत पारंपरिक दागिने घातलेले आहेत. अंकिताचा मराठमोळा लूक खूपच भारी दिसत आहे.  हे सुंदर फोटो शेअर करत अंकिता लोखंडेने कॅप्शनमध्ये लिहिले – कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या आपणास व, आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! अंकिता लोखंडेचा हा व्हिडिओ (Ankita Lokhande Latest Video) पाहिल्यानंतर चाहते सतत कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अंकिता सध्या तिचे वैवाहिक जीवन खूप एन्जॉय करत आहे. या कपलचा रोमान्स सातव्या आसमानावर पाहायला मिळत आहे. लग्नानंतर अंकिताने सोशल मीडियावर सातत्याने अनेक फोटो (Ankita Photo) आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. नवीन वर्ष 2022 (New Year 2022) च्या निमित्ताने अंकिता लोखंडे आणि विकी जैन  (Ankita Lokhande And Vicky Jain)  रोमान्स करताना दिसले. तिची झलक या जोडप्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी