Ankita Lokhande : लग्नाआधी अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, फोटो केला शेअर, चाहते म्हणाले, 'गेट वेल सून'

मालिका-ए-रोज
Updated Dec 09, 2021 | 18:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ankita lokhande met with an accident : लग्नाआधी अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली आहे. तिचा पाय मुरगळला असून डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुढील विधी कसे पार पडणार ही चिंता तिच्या फॅन्सना सतावत आहे.

Ankita Lokhande had an accident , fans said, 'Get well soon'
लग्नाआधी अंकिता लोखंडेच्या पायालाात दुखापत, इन्स्टावर फोटो शेअर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नाआधी अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत
  • पाय मुरगळ्याने डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
  • 14 डिसेंबरला अंकिता आणि विकी जैनचं होणार लग्न


Ankita lokhande and Vicky Jain wedding update : नवी दिल्ली : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाइतकीच स्मॉल स्क्रीनवरील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita lokhande)च्या लग्नाची चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून अंकिता (Ankita lokhande)तिच्या लग्नामध्ये व्यस्त आहे. मात्र, आता अंकिता (Ankita lokhande)च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लग्नाआधी तिचा पाय मुरगळल्याची बातमी समोर आलीय. आता अंकिताची प्रकृती ठीक असली तरी डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 

अंकिता लोखंडे (Ankita lokhande) लवकरच विकी जैन ( Vicky Jain ) सोबत सात फेरे घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेचे
फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अगदी अलिकडेच अंकिता (Ankita lokhande) सुंदर हिरव्या रंगाच्या साडीत लग्नाआधीचे विधी पार पाडताना दिसली. आणि त्यानंतरच तिचा पाय मुरगळल्याने तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर अंकिताचे  2 फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Voompla (@voompla)

दोन फोटोंमध्ये एका बाजूला अंकिता लोखंडे  (Ankita lokhande) आणि विकी जैन ( Vicky Jain ) लग्नाच्या आधीचे विधी करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत अंकिताचा पाय क्रेप पट्टीने बांधलेला दिसत आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लग्नाच्या काही दिवस आधी अंकिताच्या पायाला दुखापत झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Voompla (@voompla)

प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अंकिता लोखंडे  (Ankita lokhande) च्या लग्नाची उत्सुकता अनेकवेळा स्पष्टपणे दिसून आली आहे. अंकिताचा  (Ankita lokhande)  पाय मुरगळ्यानंतर लग्नाचे विधी कसे पार पाडले जातील. याबाबत आता कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अंकिताला ही दुखापत कशी झाली हे देखील कळू शकलेले नाही. त्याचबरोबर अंकिताचा पाय दुखत असल्याचे फोटोज समोर आल्यानंतर चाहते अंकिताला सातत्याने गेट वेल सूनचा संदेश देत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी