Tunisha Sharma Death :छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma)आत्महत्या केली आहे. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. (At the age of 20, TV actress Tunisha Sharma committed suicide on the sets)
अधिक वाचा : Kareena Kapoorसारखी झिरो फिगर मिळवायची असेल तर खा 'या' बिया
मिळालेल्या माहितीनुसार, शुटिग दरम्यान टी ब्रेक झाला असताना तिने आत्महत्या केली. टॉयलेटमध्ये गेलेल्या तुनिषा शर्मा हिने बऱ्याच वेळ दरवाजा उघडला नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला, त्यावेळी तुनिषा शर्मा हिने फाशी घेतल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी सांगितले. तुनिषाने आत्महत्या करण्याआधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं 'जे त्यांच्या पॅशनने प्रेरित असतात ते थांबत नाहीत', असे कॅप्शन दिले आहे. या शिवाय तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. दरम्यान, तुनिषाची आता ही शेवटची पोस्ट ठरली आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार तुनिषा गेल्या अनेक दिवसांपासून सेटवर अस्वस्थ दिसत होती.
अधिक वाचा : नाताळनिमित्त शुभेच्छा देणारे Facebook आणि WhatsApp मेसेज
तुनिषा शर्मा ही दास्तान ए काबुल या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये होती. मात्र, अचानकच तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तुनिषा शर्मा हिने इतके मोठे पाऊल नेमके का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये.
'अली बाबा दास्तान-ए-कबुल' या मालिकेत तुनिषा शर्माने मुख्य भूमिका साकारली होती. तुनिषा शर्मा ही अवघ्या वीस वर्षांची होती. हिने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या मालिकेमध्येही तुनिषा शर्माने डेब्यू केला होता.