बिग बॉस 15मध्ये दिसणार बालिका वधूतली अभिनेत्री नेहा मर्दा, 4 वेळा नकारानंतर स्वीकारली ऑफर

मालिका-ए-रोज
Updated Jul 25, 2021 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दा बिग बॉसच्या 15व्या सीझनमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिला याआधी 4 वेळा विचारणा झाली होती, पण तिने नकार दिला होता.

Neha Marda
बिग बॉस 15मध्ये दिसणार बालिका वधूतली अभिनेत्री नेहा मर्दा, 4 वेळा नकारानंतर स्वीकारली ऑफर 

थोडं पण कामाचं

  • टीव्ही रिअॅलिटी कार्यक्रम बिग बॉसमध्ये दिसणार नेहा मर्दा
  • 4 वेळा नकार दिल्यानंतर अखेर स्वीकारली वाहिनीची ऑफर
  • यावेळी टीव्हीवर नाही, तर ओटीटीवर दिसणार बिग बॉस 15

मुंबई: बिग बॉस 15ची (Bigg Boss 15) तयारी सध्या जोरात सुरू आहे आणि यातल्या स्पर्धकांची (contestants) निवड अंतिम टप्प्यात आहे. ताज्या माहितीनुसार बालिका वधू (Balika Vadhu) या मालिकेतून दिसलेली अभिनेत्री (actress) नेहा मर्दा (Neha Marda) यावेळी बिग बॉस 15मध्ये दिसणार आहे. तिला याआधीही 4 वेळा बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल विचारणा (offer) करण्यात आली होती, पण तिने नकार (reject) दिला होता. मात्र या सीझनसाठी तिने या ऑफरचा स्वीकार (accepted) केला आहे.

आत्तापर्यंत नक्की झाले आहेत बिग बॉस 15साठी हे स्पर्धक

बिग बॉस 15च्या घरात जाण्यासाठी आत्तापर्यंत अमित टंडन, दिव्या अग्रवाल, अर्जुन बिजलानी, सांगे त्शेलट्रिम आणि पूजा शर्मा यांची नावे समोर आली होती. त्यानंतर स्पॉटबॉयच्या बातमीच्या आधारे ही नवी माहिती समोर आली आहे की नेहा मर्दाही या स्पर्धकांसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.

अभिनेत्रीने केली ऑफर मिळाल्याच्या बातमीची पुष्टी

नेहा मर्दा याआधी टीव्हीवरच्या गाजलेल्या बालिका वधू, डोली अरमानो की आणि क्यूं रिश्तों में कट्टी बट्टी अशा कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना दिसली आहे. तिने बिग बॉससाठी आपल्याला विचारणा झाल्याची पुष्टी केली आहे आणि सध्या ती यासाठी तयारी करत आहे. तिने असाही दावा केला आहे की ती हा कार्यक्रम जिंकू शकते आणि घरात विजेतेपदाची एक प्रबळ दावेदार म्हणून ती उभी राहू शकते. आत्तापर्यंत टीव्हीच्या पडद्यावर एक संस्कारी सून म्हणून दिसणारी नेहा मर्दा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मात्र खूप बोल्ड रुपात दिसते. तिच्यावर तिच्या चाहत्यांचे खूप प्रेम आहे.

पहिल्यांदाच ओटीटीवर दिसणार आहे बिग बॉस

दरवेळी टीव्हीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा बिग बॉस हा कार्यक्रम यंदा फक्त ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याच्या केंद्रस्थानी टीव्ही नाही, तर ऑनलाईन क्षेत्र असणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी