Surekha Sikari : बालिका वधू फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

आपल्या दमदार अभिनयाने तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या  'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता.

balika vadhu badhaai ho actress surekha sikri passes away at 75
बालिका वधू फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन 

थोडं पण कामाचं

  • आपल्या दमदार अभिनयाने तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या  'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे.
  • त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता.
  • हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या  'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने मीडियाला दिली. स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृती सुधारणा होण्यास सुरुवात झाली होती. त्या लोकांना ओळखूही लागल्या. मात्र, त्यांना चालताना आधार लागायचा. याआधी 2018 मध्येही त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे सुरेखाजींना अर्धांगवायूचा झटका आला. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या. मात्र, जास्त काम करु शकल्या नाहीत. 

तामास, मम्मो आणि किसा कुरसी का सारख्या हिट कलाकृतीचा सुरेखाचा भाग होत्या.

सुरेखा यांना सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. सिनेमांशिवाय त्यांनी सांझा चूल्हा, सात फेरे : सलोनी का सफर आणि बालिका वधू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

सुरेखाच्या इतर काही उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये सरफरोश, दिल्लगी, झुबिदा, श्री. श्रीमती अय्यर, रेनकोट, हमको दिवाना कर गाय, देव डी आणि शीर कोरमा यांचा समावेश आहे.

सुरेखा सिक्री कदाचित आता आपल्यामध्ये नसतील, परंतु ती आपल्यासाठी मागे राहिलेल्या उज्ज्वल कार्याबद्दल अभिनेत्री नेहमीच लक्षात राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी