Bhagya Dile Tu Mala : काकूबाई बोक्याला सायकलवरून घडवणार गुहागरची सफर, कावेरी-राजची रोमॅण्टिक राईड

मालिका-ए-रोज
Updated Aug 26, 2022 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bhagya Dile Tu Mala : भाग्य दिले तू मला (Bhagya dile tu mala) या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडतायेत. कधी कधी राज-कावेरी यांच्यात हुळवार नातं फुलणार असं वाटतंय. कारण, आता कावेरी तिच्या गावाची अर्थातच गुहागरची सफर राजवर्धनला चक्क सायकवरून घडवणार आहे. नुकतेच या मालिकेचे गुहागरचे (Guhagar) शूट पूर्ण करण्यात आले.

Bhagya dile tu mala Raj kaveri Guhagar cycle ride romantic climate
कावेरी-राजची गुहागरमध्ये रोमॅण्टिक सायकल राईड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाग्य दिले तू मला मालिकेत राज-कावेरीची रोमॅण्टिक सायकल राईड
  • कावेरी राजला सायकवरून घडवणार गुहारगर दर्शन
  • काकू आणि बोक्याची अफलातून केमिस्ट्री

Bhagya Dile Tu Mala Guhagar scene: भाग्य दिले तू मला (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेतील काकू आणि बोक्याची ही रोमॅण्टिक कॉमेडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. काकू-बोक्याची जोडी प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी काहीशी गत या दोघांची मालिकेत दिसत आहे. गुहारगरला जातानाही दोघांची तू तू मै मै सुरूच आहे. काकू-बोक्याचं हे एकमेकांना टोमणे मारणं मात्र तरीही कायम सोबत असणं. ( Bhagya dile tu mala Raj kaveri Guhagar cycle ride romantic climate )

अधिक वाचा : चंडीगढला निघालेली सोनाली गोव्याला कशी पोहोचली?नेमकं काय घडलं


गुहागरला जातानाच त्यांची  ही तू तू मै मै असेल तर विचार करा प्रत्यक्षात तिथे गेल्यावर काय काय घडेल. कावेरी तिच्या गावी म्हणजेच गुहागर गेली आहे. अर्थातच सोबत राजवर्धनही आहेच.

गावी आलेल्या राजवर्धन आणि कावेरीमध्ये प्रेमाचे रंग हळू हळू रंगू लागले आहेत. ही काकूबाई राजवर्धनलाही आवडू लागलेली आहे. मालिकेच्या या महाएपिसोडचे BTS व्हिडीओ आणि फोटोज समोर आले आहेत  एपिसोडच्या सीनमध्ये प्रचंड धम्माल करताना दिसत आहेत.

अधिक वाचा : स्कूल युनिफॉर्ममधल्या 'या'दबंग अभिनेत्रीला ओळखलंत?

काकू अर्थातच कावेरी बोक्याला म्हणजेच राजवर्धनला गुहागरची सफर घडवणार आहे, आणि ही सफर गाडीतून नव्हे तर चक्क सायकवरून बोक्याला गुहागर दर्शन 
काकू घडवणार आहे. बोक्यालाही काकू आवडायला लागल्यामुळेच की काय सायकवरून गुहागर फिरायला बोका तयारही झालाय. 

अधिक वाचा : या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! डीएमध्ये 5% ची वाढ

एकूणंच काय तर गुहागरचे रोमॅण्टिक वातावरण, ती शांतता काकू-बोक्यात प्रेमांचे रंग फुलवणार का? की नेहमीप्रमाणे तिथेही काहीतरी ट्विस्ट येणार हे लवकरच कळेल.

राज कावेरीच्या या सायकल सफारीत काय काय घडणार? हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढलेली असणार, तेव्हा हा महाएपिसोड कलर्स मराठीवर तुम्हाला रविवारी पाहता येणार आहे, सो जस्ट वेट अँड वॉच. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी