Bharti Singh Harsh Limbachiyaa Baby Boy: भारती सिंग आणि हर्ष लिबांचिया यांच्या घरी तान्हुल्याचा आवाज ऐकायला येणार आहे. भारती आणि हर्ष हे मुलाचे आई-वडील झाले आहेत. हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर केली आहे.भारतीने 2021 मध्ये प्रेग्नंसीची बातमी शेअर केली होती.यानंतर हे जोडपे सतत त्यांच्या प्रेग्नेंसीचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत होते.
हर्ष लिंबाचियाने स्वतःचा आणि भारती सिंगसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये भारती सिंग आणि हर्ष दोघेही पांढऱ्या रंगाच्या मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहेत. हर्ष लिंबाचियाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'It's a BOY' हर्षच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले आहे. हर्षच्या पोस्टवर टिप्पणी करताना, बिग बॉस 15 स्पर्धक जय भानुशालीने लिहिले, 'अभिनंदन.' गायक आणि बिग बॉस 14 चे स्पर्धक राहुल वैद्य यांनी लिहिले, 'बाळाला पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. अभिनंदन.' उमर रियाझने लिहिले, ' तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.'
भारती सिंगने डिसेंबर 2021 मध्ये सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली होती. भारतीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती खरंच गरोदर असल्याची घोषणा करण्यात आली होती.
भारती यांनी 3 डिसेंबर 2017 रोजी लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फंक्शन गोव्यात 5 दिवस चालले. तीन वर्षांनी लहान असलेल्या हर्षला वर्षभर डेट केल्यानंतर भारतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.