Bigg Boss 16 : बिग बॉसच्या नव्या सीझनची उत्सुकता शिगेला, 'हे' आहेत बिग बॉस 16 च्या सीझनचे स्पर्धक

मालिका-ए-रोज
Updated Sep 22, 2022 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 16 Confirmed Contestants : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) बाबत प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कोणते स्पर्धक यावेळी शोमध्ये सहभागी होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. त्यातच बिग बॉस 16च्या स्पर्धकांची लिस्ट (Bigg Boss 16 Contestants list)समोर आली आहे. पाहुया कोणकोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात नशीब आजमावणार आहेत.

Big Boss 16 new season contestants to enter in BB house
कोण आहेत बिग बॉस 16च्या सीझनचे स्पर्धक?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'बिग बॉस 16' ची उत्सुकता शिगेला
  • सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची लिस्ट आली समोर
  • 'हे' सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात नशीब आजमावणार

Bigg Boss 16 Confirmed Contestants : बिग बॉस 16 ची (Bigg Boss 16) उत्सुकता साऱ्यांनाच आहे. प्रेक्षक खूप आतुरतेने नव्या सीझनची वाट पाहात आहेत. 
या शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो, "15 वर्ष बिग बॉसने स्पर्धकांचा गेम पाहिला, यावेळी बिग बॉस त्यांच्या गेम दाखवणार आहे.
यावेळी कोणतेही नियम नसतील कारण, बिग बॉस स्वत: गेम खेळणार आहेत" बिग बॉसचा हा प्रोमो खूपच इन्ट्रेस्टिंग आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी 
हजेरी लावणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे  (Bigg Boss 16 Contestants list). मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिविन नारंग, कनिका मान, शालीन भानोट, जन्नत जुबैर आणि टीना दत्ता हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं समजतंय. (Big Boss 16 new season contestants to enter in BB house)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

शिविन नारंग

shiving narang

शिविन नारंग हा स्मॉल स्क्रीनवरील एक सेलिब्रिटी आहे. यावेळी शिवीन बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे. याआधी तो 'खतरों के खिलाडी 10' मध्ये दिसला होता. 
गेल्या वर्षी, शिवीन बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून दिसणार होता. पण शिविनला शोच्या सुरुवातीपासून सहभागी व्हायचं होतं. 

अधिक वाचा : सचिन तेंडुलकरचा किचनमध्ये दाखवतोय पाककला


कनिका मान

कनिका मान बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार आहे. सूत्रानुसार, कनिकाने हा शो साइन केला आहे. कनिका खतरों के खिलाडी 12 मध्येही दिसली होती. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात कनिका काय धमाल करणार ते लवकरच कळेल.

जन्नत जुबैर

बिग बॉसच्या या सीझनमध्ये जन्नत जुबैरही स्पर्धक म्हणून दिसणार आहे. विशेष म्हणजे जन्नतकडे छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून पाहिलं जात आहे. आता जन्नत शोमध्ये काय धमाका करणार त्याचीच उत्सुकता आहे. 

मदिराक्षी मुंडले

मदिराक्षी मुंडलेसुद्धा बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावणा आहे. 'सिया के राम' या शोमधून अभिनेत्रीला ओळख मिळाली. मदिराक्षीने अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. 

अधिक वाचा : पती हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत करत होता रासलीला, पत्नी पोहोचली..

प्रकृती मिश्रा

ओडिया अभिनेत्री प्रकृति मिश्रा देखील बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे. 'बिट्टी बिझनेस वाली' मधून या अभिनेत्रीला ओळख मिळाली. यापूर्वी ही अभिनेत्री वादात सापडली आहे. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये जावून ही कोणता नवीन वाद ओढवून घेते का तेच पाहायचं. 

शालीन भनोट

शालीन भानोटही बिग बॉस 16 मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. स्मॉल स्क्रीनचा हा लोकप्रिय चेहरा आहे. शालीन भानोटने खतरों के खिलाडीमध्येही भाग घेतला होता.

अधिक वाचा : या चुकीच्या सवयींमुळे होतं डोळ्याचं नुकसान

टीना दत्ता

tina dutta

उत्तरन फेम अभिनेत्री टीना दत्ता यावेळी बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. दरवर्षी अभिनेत्रीच्या नावाची चर्चा होते. मात्र, यावेळी ती बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार आहे. सोशल मीडियावर टीनाचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी