बिग बॉस १३ची स्पर्धक शहनाज गिलच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप

मालिका-ए-रोज
Updated May 21, 2020 | 15:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बिग बॉस १३ची स्पर्धक शहनाज गिलच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी याप्रकरणी केस दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

Shehnaaz Gill
बिग बॉस १३च्या या स्पर्धकाच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १३ची स्पर्धक शहनाज गिलचे वडील संतोक सिंग यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे
  • संतोक सिंग यांनी बंदुकीचा धाक दाखवत कारमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे
  • पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे

मुंबई: बिग बॉस १३ची स्पर्धक शहनाज गिलचे वडील संतोक सिंगवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बातम्यांनुसार संतोक सिंग यांनी बंदुकीचा धाक दाखवत कारमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४०वर्षीय जालंधरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने संतोक सिंग यांच्यावर हा आरोप केला आहे. तिने सांगितले की कारमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या मते हे प्रकरण १४ मे २०२०चे आहे. तर या प्रकरणी १९ मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. केस दाखल झाल्यानंतर संतोक सिंग फरार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@santokhsukh2 Good night friends stay home

A post shared by SANTOKH SINGH SUKH (@santokhsukh1) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@santokhsukh2 please apne ghar mein Raho aur safe Raho

A post shared by SANTOKH SINGH SUKH (@santokhsukh1) on

पीडित महिलेने सांगितले की, १४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ती बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. तेव्हा शहनाजच्या वडिलांनी तिला रोखले आणि कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या माहितीनुसार, संतोक सिंग यांनी धमकी दिली की या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नको. महिलेच्या मते तिचे आपला बॉयफ्रेंड रणधीर सिंग सिद्धूशी भांडण झाले होते. यानंतर तो संतोक सिंग यांच्या घरी राहत होता. त्यालाच भेटण्यासाठी ती तेथे आली होती. गेल्या १२ वर्षांपासून ती त्याला ओळखत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“I collect smiles, and then I give them away.”❤️

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill) on

इनचार्ज इन्स्पेक्टर हरदीप कौर यांनी महिलेच्या तक्रारीनंतर संतोक सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनंतर पोलिसांची टीम जेव्हा संतोक सिंग यांच्या घरी पोहोचली तेव्हा ते तेथून फरार झाले होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी