बिग बॉसच्या नव्या घरात या दमदार पाहुण्यांची एन्ट्री

मालिका-ए-रोज
Updated May 26, 2019 | 23:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big boss marathi season 2: बिग बॉस मराठी २ च्या सिझनला सुरूवात झाली आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांची उत्सुकता आता संपली असून १५ नव्या पाहुण्यांची एन्ट्री या घरात झाली आहे. बघुया आता कोणा आहेत हे नवे पाहुणे.

Big boss marathi 2
बिग बॉसच्या घरात उद्यापासून असणार या स्पर्धकांचा कल्ला 

Big Boss Marathi Season 2 Competitor: आता बिग बॉस मराठी २ ची उत्सुकता संपली आहे. बिग बॉस मराठी २ च्या सिझनला आजपासून सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे तब्बल एक महिना दिर्घ कालावधीनंतर दुसऱ्या सिझनला सुरूवात झाली आहे. एप्रिल महिन्यात या सिझनची जाहिरात टीव्ही दाखवल्यापासून बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. तर या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात नेमकं कोण जाणार या संबंधीची यादी देखील व्हायरल होतं होती. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. बिग बॉस मराठी २ सिझनला सुरूवात झाली. आज बिग बॉस २ चा ग्रॅंड प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्यात बिग बॉसच्या घरात पाहुण्यांची एन्ट्री झाली आहे. एक नजर टाकूया नेमकं कोणीकोणी बिग बॉस २ च्या घरात एन्ट्री केली आहे. 

 1. किशोरी शहाणे
 2. नेहा शितोळे
 3. दिगंबर नाईक
 4. अभिजीत आवाडे- बिचकुले
 5. वीणा जगताप 
 6. वैशाली माडे
 7. शिवानी सुर्वे
 8. शिव ठाकरे 
 9. सुरेखा पुणेकर
 10. विद्याधर जोशी
 11. पराग कान्हेरे
 12. मैथिली जावकर
 13. रूपाली भोसले
 14. माधव देवचक्के
 15. अभिजित केळकर

या  १५ कलाकारांनी बिग बॉस २ च्या घरात एन्ट्री केली आहे. खरी मजा तर उद्यापासून येणार आहे. उद्यापासून मराठी कलाकारांची मैत्री, प्रेम, राग, भांडण, वाद विवाद,वेगवेगळे टास्क त्यामधली मैत्री वाद पाहायला मिळेल. २७ मे रोजी पासून रात्री ९.३० वाजता आपल्याला या बिग बॉस २ मराठी सिझनचा शो कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. उद्या १०० दिवस या बिग बॉस सिझन २ मध्ये स्पर्धकांचा कल्ला पाहायला मिळणार आहे.

 

 

 

 

 

 

आजच्या सोहळ्याची सुरूवात एकदम शो प्रमाणेच ग्रँड झाली. शोची सुरूवात महेश मांजरेकरांनी अफलातून डान्स परफॉर्मन्सनी केली. त्यानंतर महेश मांजरेकरांनी घराची सफर केली. गेल्या सिझनप्रमाणे या सिझनमध्ये ही महेश मांजरेकर सुत्रसंचालन करताना दिसतील. पहिल्या सिझनमधल्या त्यांच्या हटके स्टाईल आणि अंदाजात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

बिग बॉस मराठीतलं पहिलं सीझन एकदम सुपरहिट ठरलं. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रिमिअर झालेल्या या शोचं याच महिन्यात दुसऱ्या सीझनसोबत पुर्नागमन होणार असं बोलंल जात होतं. मात्र निवडणुकांमुळे हा सिझन लांबणीवर गेला होता. पहिलं सीझन गाजल्यावर दुसऱ्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे त्याचे टीझर येताच सगळीकडे फक्त आणि फक्त बिग बॉस मराठीचीच हवा होती. दुसरं सीझन सुरू व्हायच्या आतंच त्याची लोकप्रियता पाहायला मिळत होती. त्यामुळे निर्मात्यांना सुद्धा शो एप्रिलमध्ये लॉन्च करायचा होता. तसाच विचार असल्याने त्याचे टीझर महिनाभर आधी प्रसारित करण्यास सुरूवातही झाली. पण येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे शोला फटका बसला आणि शो लांबणीवर गेला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बिग बॉसच्या नव्या घरात या दमदार पाहुण्यांची एन्ट्री Description: Big boss marathi season 2: बिग बॉस मराठी २ च्या सिझनला सुरूवात झाली आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांची उत्सुकता आता संपली असून १५ नव्या पाहुण्यांची एन्ट्री या घरात झाली आहे. बघुया आता कोणा आहेत हे नवे पाहुणे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles