बिग बॉस मराठी 2च्या घरामध्ये दिसणार जेल

मालिका-ए-रोज
Updated May 16, 2019 | 16:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big Boss Marathi House to Have a Jail: बिग बॉस मराठी 2ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जसजशी तारीख जवळ येतेय तसतश्या शो बद्दलच्या बातम्या जोर धरु लागल्यात. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार बिग बॉसच्या घरात जेल असणार

Big Boss Marathi Season 2 house will have a jail inside the house
बिग बॉस मराठी 2च्या घरामध्ये हिंदी बिग बॉस सारखंच जेल दिसणार (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सीझन सुरु व्हायला काहीच दिवस उरले असून या संदर्भातल्या नवनीवन बातम्यांनी जोर धरला आहे. शोसंबंधीत छोट्यात छोटी बातमी सुद्धा व्हायरल होताना दिसत आहे. अशीच एक बातमी हाती आली असून सध्या त्या बातमीने उस्तुकता वाढवली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार, यंदा बिग बॉस मराठीच्या घरात जेल दिसणार असल्याचं समोर आलं आहे. हे कळताच आम्ही सुद्धा आमच्या सूत्रांना गाठलं आणि आमच्या परिने याबद्दल अधिक महिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या बातमीच्या मुळाशी जाता आमच्या हाती सुद्धा या बिग बॉस मराठी 2च्या घरातल्या जेलबद्दल एक्स्लुझिव्ह माहिती हाती लागली आहे.

तर माहिती अशी आहे की बिग बॉसच्या घरात जेल असणार हे तर पक्कं आहे पण त्याचा आराखडा कसा असणार यावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झालेला नाहीये. शिवाय हे जेल कसं दिसणार ते नेमकं कुठे असेल यावर सुद्धा अजून चर्चा सुरु आहे असं आमच्या सूत्रांकडून आम्हाला समजलं आहे. घरात जेल असणार हे जरी नक्की झालं असलं तरी त्याबद्दलचा लूक त्याचे नियम वगैरेंवर अजून फेर विचार सुरु आहेत असं देखील कळलं आहे. बिग बॉस हिंदीच्या मागील काही सीझन्समध्ये जेल पहायला मिळत आहे. दर आठवड्याला या जेलची शिक्षा भोगण्यासाठी स्पर्धक निवडले जातात. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉस 12मध्ये तर जेलमध्ये जाण्यावरुन आणि जेलमध्ये गेल्यानंतर बरेच वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या जेलमुळे शोसाठी कॉन्ट्रोवर्शियल कन्टेन्ट सुद्धा नक्कीच मिळालं. हाच विचार करुन बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये या जेलचा प्रस्ताव ठेवला गेला असणार हे निश्चित.

यंदा बिग बॉस मराठीचं घर लोणावळ्यात नसून मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीत उभारण्यात आलं आहे. त्यामुळे घराचा लूक सुद्धा यंदा बदललेला पहायला मिळणार आहे. त्याशिवाय जेल बरोबरचं अजून बऱ्याच गोष्टी घरात नवीन असतील असं सुद्धा बोलंल जात आहे. सध्या या घरावरचं काम जवळपास पूर्ण झालं असून येत्या 26 मे या तारखेला या घराचं पहिलं-वहिलं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. त्याचसोबत सध्या अंदाज वर्तवलेला जात असलेल्या नावांपैकी नेमकी किती नावं या घरात एन्ट्री घेतात ते सुद्धा पाहणं रंजक ठरणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनच्या दिमाखदार प्रमिअरसाठी प्रेक्षक सज्ज झाले असून येत्या 26 मेची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
बिग बॉस मराठी 2च्या घरामध्ये दिसणार जेल Description: Big Boss Marathi House to Have a Jail: बिग बॉस मराठी 2ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जसजशी तारीख जवळ येतेय तसतश्या शो बद्दलच्या बातम्या जोर धरु लागल्यात. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार बिग बॉसच्या घरात जेल असणार
Loading...
Loading...
Loading...