Big Boss Marathi 4 : चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ" म्हणत, बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चं टायटल साँग रिलीज

मालिका-ए-रोज
Updated May 08, 2023 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big boss Marathi 4 title song : बिग बॉस मराठी सीझन 4 (Big boss Marathi 4)ची प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. हा सीझन येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) हा शो होस्ट करणार आहेत. नुकताच बिग बॉस मराठी सीझन 4 चं टायटल साँग (Big boss Marathi 4 title song) रिलीज करण्यात आलं. आधीच्या 3 सीझनपेक्षा यंदाचं टायटल साँग खूपच हटके आहे. एकदम 'यो स्टाईल'मध्ये या साँगचं चित्रीकरणही करण्यात आलेलं आहे.

big boss marathi season 4 title song released
बिग बॉस मराठी सीझन 4चं टायटल साँग रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठी सीझन 4 चं टायटल साँग रिलीज
  • 2 ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी सीझन 4 येणार भेटीला
  • महेश मांजरेकर म्हणतायेत, "चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ"

Big boss Marathi 4 title song : बिग बॉस मराठी सीझन 4 (Big boss Marathi 4) ची प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. हा सीझन येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) हा शो होस्ट करणार आहेत. नुकताच बिग बॉस मराठी सीझन 4 चं टायटल साँग (Big boss Marathi 4 title song) रिलीज करण्यात आलं. आधीच्या 3 सीझनपेक्षा यंदाचं टायटल साँग खूपच हटके आहे. एकदम 'यो स्टाईल'मध्ये या साँगचं चित्रीकरणही करण्यात आलेलं आहे. (big boss marathi season 4 title song released)

चौथ्या सीझनची घोषणा झाल्यापासून साऱ्यांनाच या नव्या सीझनची खूपच उत्सुकता आहे. या सीझनची थीमही वेगळी आहे. 100 दिवसांचा हा खेळ येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकही बिग बॉसची आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या घरात येणारे एकाहून एक सरस सेलिब्रिटी, अतरंगी कलाकार त्यांची होणारी भांडणं, रुसवे, फुगवे, प्रेम यामुळे हा शो खूपच इंन्ट्रेस्टिंग होतो. बिग बॉस घर हादेखील आकर्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यंदा BB हाऊसप्रमाणेच रिएलिटी शोचं टायटल साँगही तितकंच चर्चेत आहे. हे साँग नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांप्रमाणेच टायटल साँगही हटके आहे. काही तासांपूर्वीच हे टायटल साँग रिलीज करण्यात आलं. यंदा बिग बॉसची थीम 'ऑल इज वेल' आहे. त्यामुळे सारं काही छान आहे हे सांगणारं हे टायटल साँग खास बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आलं आहे. शो सुरू होण्यासाठी आता केवळ 9 दिवस उरले आहेत. काउंटडाऊन बिगीन्स...महेश मांजरेकरांनी हे टायटल साँग त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेलं आहे. महेश मांजरेकर म्हणतात, " मनोरंजनाचा खजिना खुलणार, 100 दिवसांचा खेळ रंगणार..."BIGG BOSS मराठी" यंदा ALL IS WELL... हे सांगणारं टायटल साँग... खास तुमच्यासाठी!"BIGG BOSS मराठी" Grand Premiere, 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम - शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @voot वर.#ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4"

अधिक वाचा :  फिट असूनही सेलेब्रिटींना का येतो हार्ट अटॅक?

याआधीच्या 3 सीझनपेक्षा यंदाचं टायटल साँग खूपच हटके आहे. "चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ" असं म्हणत महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घ्यायला तयार झालेले आहेत. प्रेक्षकही या टायटल साँगवर एकाहून एक जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. सीझन 3 चा बेस्ट प्लेअर असलेल्या उत्कर्ष शिंदेनं कमेंट करत, 'ये बात हंगामा सुरू', असं म्हटलं आहे. तर एका यूजरने , 'या राड्याची खूप वाट पाहिली', असं म्हटलंय. दुसऱ्या युझरनं 'हा सीझन हिंदीला टक्कर देईल', असं म्हटलं आहे. एकूणंच काय तर प्रेक्षक बिग बॉस मराठी सीझन 4 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता उरलेत फक्त 9 दिवस... काउंटडाउन बिगिन्स... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी