बिग बॉस १३च्या पुढच्या एपिसोडसाठी सलमानला आता मिळणार इतके कोटी! 

मालिका-ए-रोज
Updated Dec 16, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 13 Salman Khan Host Extended Weeks: बिग बॉस १३ च्या वाढविण्यात आलेल्या एपिसोडमध्ये सलमान खान होस्टिंग करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

bigg boss 13 host salman khan continue as host for extended weeks with extra fees 
बिग बॉस १३च्या पुढच्या एपिसोडसाठी सलमानला आता मिळणार इतके कोटी!   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १३ हा सीझन खूपच यशस्वी ठरला
  • हा सीझन यशस्वी ठरल्याने ५ आठवडे आणखी वाढविण्यात आले 
  • बिग-बॉस १३ आता फेब्रुवारी २०२० पर्यंत सुरु राहणार

मुंबई: बिग बॉस-१३ हे आणखी पाच आठवडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर अशी बातमी समोर आली होती की, वाढवण्यात आलेल्या या एपिसोडमध्ये सलमान खानऐवजी सिनेनिर्माती फराह खान ही होस्ट असेल. बिग बॉसचा १३ वा सिझन हा खूपच यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच आता आणखी काही आठवडे हा रियालिटी शो वाढविण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. बिग बॉसचा हा सिझन आता फेब्रुवारी २०२० पर्यंत असणार आहे आणि त्याचं फिनाले हे त्याच महिन्याच्या १५ तारखेला होणार आहे. 

दरम्यान, अशी माहिती समोर येत होती की, फराह खान ही कार्यक्रमाचं होस्टिंग करेल. पण आता स्पष्ट झालं आहे की, सलमानच याचं होस्टिंग पुढेही सुरु ठेवणार आहे. कारण की, निर्मात्यांनी सलमान खानला पुढील एपिसोडसाठी देखील राजी केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Salman Khan at #Dabangg3 Promotions Today ! #salmankhan #salmankhanuniverse #salmankhanno1worldwide

A post shared by Salman Universe Fan Club (@salmanuniv) on

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि फराह हे शनिवारी महबूब स्टुडिओमध्ये भेटले आणि दोघांनीही याबाबत बराच वेळ चर्चा केली. यानंतर निर्मात्यांनी सलमान खानला बिग बॉसचे पुढील भाग करण्यासही राजी केलं. पण यासाठी चॅनलला सलमान मानधन आणखी वाढवून द्यावं लागणार आहे. यापुढच्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमानला आता जी रक्कम मिळते त्यात अधिक २ कोटी रुपये द्यावे लागणार आहे. याच अटीवर सलमान देखील बिग बॉसमध्ये राहण्यास तयार झाला असल्याचं समजतं आहे. 

सलमान सध्या आपला आगामी सिनेमा दबंग-३च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सुदीप किच्छा याने एका इव्हेंटमध्ये बोलताना असं म्हटलं होतं की, सलमान खानशिवाय बिग बॉस होऊच शकत नाही. दरम्यान, सलमानने याआधी देखील अनेकदा म्हटलं आहे की, आता तो बिग बॉसचं होस्टिंग करुन थकला आहे. आपण रोज-रोज ती भांडणं पाहू शकत नाही. तसंच खान कुटुंबीयांनी देखील त्याला बिग बॉस सोडण्याचा सल्ला दिला आहे. याच सगळ्या कारणांमुळे निर्मात्यांना सलमानला राजी करणं थोडसं जड गेलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी