Bigg Boss 13: बिग बॉसची नवीन घोषणा, पुढच्या आठवड्यापासून पुरुष स्पर्धकही होणार नॉमिनेट

मालिका-ए-रोज
Updated Oct 11, 2019 | 17:31 IST | चित्राली चोगले

बिग बॉस १३मध्ये ५ पुरुष तर ८ स्त्रिया आहेत. त्यामुळे सुरुवातीला असं जाहीर झालं होतं ती पहिल्या ४ आठवड्यात एकही पुरुष स्पर्धक एलिमिनेट होणार नाही. पण आता खुद्द बिग बॉसने जाहीर केलंय आणि हा नियम बदलला गेला आहे.

bigg boss 13 new announcement boys to get nominated next week onwards for eliminations
Bigg Boss 13: बिग बॉसची नवीन घोषणा, पुढच्या आठवड्यापासून पुरुष स्पर्धकही होणार नॉमिनेट  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १३मध्ये आता पुरुष स्पर्धकही होणार नॉमिनेट
  • बिग बॉस यांनी केला नवीन नियम जाहीर
  • पुरुषांसाठी आज बिग बॉस घरात रंगणार पहिलं नॉमिनेशन टास्क

मुंबई: बिग बॉस १३चा दुसरा आठवडा देखील संपत आला आहे. या वेळेला बरेच नियम वेगळे पाहायला मिळत आहेत. आधीच असं जाहीर केलं गेलं आहे की यंदा दोन फिनाले असणार आहेत म्हणजे एक खेळाच्या ४ आठवड्यानंतर तर एक खेळाच्या शेवटी जो ग्रॅण्ड फिनाले असेल तो. तसंच यंदा घरात पुरुष संपर्धकांच्या तुलनेत स्त्री स्पर्धक जास्त दाखल झाले. जिथे पाच पुरुष घरात दिसत आहेत तिथे त्यांच्यासमोर आठ स्त्रिया घरात वावरत आहेत. बिग बॉस यांनी खेळाच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं की पहिल्या फिनाले पर्यंत म्हणजे पहिल्या ४ आठवड्यात एकही पुरुष घरात नॉमिनेट होणार नाही. म्हणजेच कोणताही पुरुष स्पर्धक घरातून पहिल्या चार आठवड्यात एलिमिनेट ही होणार नव्हता.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मात्र हा नियम पूर्णपणे बदललेला दिसला. खुद्द बिग बॉस यांनी जाहीर केलं की आता पुढच्या आठवड्यापासून पुरुष स्पर्धक देखील नॉमिनेट होणार आहेत. तसंच ते एलिमिनेट देखील होतील. बिग बॉस यांनी गेल्या आठवड्यात घरातील पुरुषांसाठी रिपोर्ट कार्ड हा टास्क घेतला होता. हाच टास्क या आठवड्यात सुद्धा पुढे सुरु राहिला. घरातली स्त्रियांना या सगळ्या पुरुषांना काळ्या रिंग्स द्यायला सांगितल्या गेल्या आणि या आठवड्याचा पूर्ण हिशोब बघता सगळ्यात जास्त रिंगा असलेला पुरुष पुढच्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या नॉमिनेशनच्या खूप जवळ जाईल असं जाहीर झालं.

 

 

त्यात पारस छाब्रा आणि सिद्धार्थ शुक्लाला सगळ्यात जास्त म्हणजे ४ रिंग्स मिळाल्या. या पुढे जात आजच्या एपिसोडमध्ये या सगळ्या पुरुषांसाठी पहिलं नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. पुढच्या आठवड्यात कुठला पुरुष घरातून बाहेर जाणार यासाठी आज बिगुल फुंकलं जाणार आहे. जसं स्त्रियांच्या नॉमिनेशनची धुरा पुरुषांच्या हातात असते तसंच पुरुषांच्या नॉमिनेशनची धुरा आता स्त्रियांच्या हातात असणार आहे. आज घरात टास्कमध्ये सगळ्या स्त्रियांना प्रत्येकी एक माशांनी भरलेली टोपली दिली जाणार आहे. प्रत्येक पुरुषाच्या नावाचं एक डबकं बनलेलं असेल. ज्या पुरुषाच्या डबक्यामध्ये सगळ्यात जास्त मासे असतील तो नॉमिनेट होणर आहे. त्यामुळे आजचा एपिसोड कमाल रंगणार आहे हे नक्की.

 

 

याचसोबत आजच्या एपिसोडमध्ये हायपॉईंट ठरेल ते अजून एक टास्क. घरात या आठवड्याला कोयना मित्रा, रश्मी देसाई, दलजीत कौर आणि शेहनाझ गील नॉमिनेटेड आहेत. त्यांना आज बिग बॉस एक सुर्वण संधी देणार आहेत. एका टास्कमधून या चौघींपैकी कोणाला एकीला स्वतःला सेफ करण्याची संधी मिळणार आहे. पण या टास्कमध्ये बराच गोंधळ होत टास्कमध्ये आलेल्या प्रॉपर्टीचं नुकसान या सगळ्या करणार आहेत. त्यामुळे पुढे यावर काय निर्णय होतो ते पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी