Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या लव ट्रँगलमध्ये आज होणार मोठा वाद

मालिका-ए-रोज
Updated Oct 04, 2019 | 16:47 IST | चित्राली चोगले

बिग बॉस १३मध्ये सध्या खेळाचा पहिलाच आठवडा सुरु आहे पण तरीही सगळ्यांचे रंग हळू-हळू दिसू लागलेत. सुरुवातीलाच काही ठिकाणी मैत्री तर कुठे दुश्मनी झालीये. तसंच घरात प्रेमाचे रंग ही दिसू लागलेत. त्यात आज वाद होणारय.

bigg boss 13 new love triangle and a fight erupts between shehnaz gill and mahira sharma for paras chabbra salman khan siddharth Shukla rashami desai
Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या लव्ह ट्राएँगलमध्ये आज होणार वाद, पारससाठी शेहनाझ विरुद्ध माहिरा अभी ठाकणार  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १३मध्ये आज रंगणार घरात मोठा वाद
  • पारससाठी शेहनाझ आणि माहिरामध्ये जोरदार भांडण होणार
  • काय होणार या लव ट्रँगलचा फैसला?

मुंबई: बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन एकदम धमाकेदार नोटवर सुरु झालं. घरात सगळे स्पर्धक हळू-हळू रुळू लागले आहेत पण तसंच घरात आपआपला कम्फर्ट झोन सुद्धा सगळ्यांनी शोधला आहे. काही ठिकाणी मैत्री झाली असून कुठेतरी दुश्मनीने देखील जागा बनवली आहेच. अशातंच पहिल्याच साप्ताहिक टाक्सने तर सगळ्यांचे एकदम खरे चेहरे बाहरे आणले. या सगळ्या ड्रामा आणि वादामध्ये काही ठिकाणी प्रेम खुलू लागलं आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापुढे जाऊन एक लव्ह ट्रँगल घरात निर्माण झाला आहे असं सुद्धा वाटतं. याच त्रिकुटात आज मोठा वाद रंगणार आहे.

बिग बॉस घरातला हॅण्डसम हंक पारस छाब्रा घरा बाहेर तरणींमध्ये फार लोकप्रिय आहे तसंच घरात त्याच्या अवती-भवती मुलींचा गराडा असतो. त्यात शेहनाझ गील तर पहिल्या दिवसापासून त्याच्यामध्ये फारंच जास्त इंटरेस्ट घेताना दिसत आहे. तशीच त्याची खास मैत्रीण माहिरा शर्मा सुद्धा कायम त्याच्यासोबत दिसते. आता झालंय असं की पारस या दोघींकडून मिळणारं अटेन्शन एन्जॉय करत आहे. पण दोघींमध्ये मात्र एक कोल्ड वॉर सुरु आहे.

आज हा सुरु असलेला कोल्ड वॉर एकदम गरमागरम होणार आहे. आज घरात माहिरा थेट शेहनाझला विचारताना दिसेल की तिला माहिरा आणि पारसच्या मैत्रीबद्दल काय प्रॉब्लेम आहे. हे विचारत असताना पारस तिथे हजर असणार आहे. त्यावर शेहनाझ माहिराला ती अजिबात त्या दोघांबद्दल जलस नाही असं सांगेल. तसंच पारस तेच करेल जे शेहनाझ त्याला सांगेल असं सुद्धा ठामपणे सांगताना दिसेल. त्यावर माहिरा प्रचंड चिडेल आणि शेहनाझला बरंच सुनावताना दिसेल.

यावर पारस मात्र हे सगळं फक्त ऐकत त्याची मज्जा लुटताना दिसेल पण काही बोलणार नाही. हा विषय खूप वाढेल आणि शेहनाझ - माहिरा एकमेकींना भरपूर बोलताना दिसतील. त्यांचा वाद बराच टोकाला जाईल. एका क्षणी शेहनाझ माहिराला प्रश्न विचारताना दिसेल की, पारस तिचा बॉयफ्रेंड तर नाहीये मग तिला एवढी का पडलेली आहे त्याची?. यावर माहिराचा संताप होईल आणि ती शेहनाझला बॉयफ्रेंड वगैरे शब्द वापरायचे नाहीत अशी ताकिद देईल. यात घरातले इतर स्पर्धक दोघींना शांत करण्याचा प्रयत्न तर करतील पण हा वाद बरंच टोक गाठेल असं दिसत आहे. यावर पुढे या दोघी अजून काय बोलतात आणि यावर खुद्द पारस काही रिअॅक्ट होतो का ते आजच्या भागात स्पष्ट होईलंच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी