Bigg Boss 13: बिग बॉसच्या घरात खुलू लागल्यात २ लव स्टोरीज

मालिका-ए-रोज
Updated Oct 07, 2019 | 17:39 IST | चित्राली चोगले

बिग बॉस १३चा पहिला वहिला विकेन्डचा वार नुकताच पार पडला. होस्ट सलमान खान नेहमीप्रमाणे जोरदार बॅटिंग करताना दिसला. पण पहिलाच आठवडा आसल्यामुळे कोणीही एलिमिनेट झालं नाही तर दुसरीकडे घरात प्रेम खुलू लागलं आहे.

bigg boss 13 no eliminations happen at the first weekend vaar while 2 love stories blooming in the house
Bigg Boss 13: पहिल्याच विकेन्डच्या वारला कोणीच झालं नाही एलिमिनेट, दुसरीकडे घरात खुलू लागल्यात २ लव्हस्टोरीज  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सलमान खानसोबत बिग बॉस १३चा पहिला जोरदार विकेन्डचा वार रंगला
  • पहिल्याच आठवड्यात एकही एलिमिनेशन नाही
  • बिग बॉस घरात खुलू लागल्या आहेत २ लव स्टोरीज

मुंबई: बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन सुरु होऊन आता एक आठवडा उलटला आहे. घरात दाखल झालेले १३ स्पर्धक घरात रुळू देखील लागले आहेत. त्यातच घरात रंगला तो या सीझनचा पहिला-वहिला विकेन्डचा वार. संपूर्ण आठवडा पार पडला की होस्ट सलमान खान त्याच्या स्टाईलमध्ये सगळ्या स्पर्धकांना कानमंत्र देत त्यांना फटकारताना दिसतो. या १३व्या सीझनच्या पहिल्या विकेन्डच्या वारकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. जितकी उत्सुकता बिग बॉसच्या घरात याबद्दल होती तितकीच ती घराबाहेर प्रेक्षकांमध्ये देखील होती. हा वार रंगला तर उत्तम पण अनेकांनी अंदाज लावल्याप्रमाणेच पार पडला.

घरात पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये मज्जा तर आली आणि ठरल्याप्रमाणे भांडणं देखील झाली. यामधून ५ स्पर्धक रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्यजी, शेफीला बग्गा, दलजित कौर आणि कोयना मित्रा नॉमिनेट देखील झाल्या. पण मग लगेचंच वोटिंग लाईन्स बंद असल्याचं प्रेक्षकांसाठी जाहीर केलं गेलं. त्यामुळे बिग बॉसच्या घरात टेन्शन असलं तरी बाहेर अनेकांनी अंदाज लावला होता की यंदा एलिमिनेशन होणार नाही. अगदी तसंच झालं. होस्ट सलमानने या सीझनच्या पहिल्याच विकेन्डच्या वारमध्ये एकदम दमदार एन्ट्री घेतली आणि येताच जाहीर केलं की या आठवड्यात एलिमिनेशन होणार नाहीत. त्यानंतर त्याने स्पर्धकांना कानमंत्र दिले, काहींना सुनावलं आणि थोडी धमाल देखील केली. एलिमिनेशनची टांगती तलवार त्याने शेवटपर्यंत स्पर्धकांच्या डोक्यावर तर ठेवली पण नंतर जाहीर केलं की सगळे सेफ आहेत.


पारस-शेहनाझचं कनेक्शन

एकीकडे हे सगळं तर पार पडलं पण विकेन्डच्या या वारमध्ये दोन ठिकाणी प्रेमाची भडकत असलेली ठिणगी दिसून आली. सीझन सुरु होताच पारस आणि शेहनाझमध्ये एक वेगळं कनेक्शन दिसून आलं. नुकत्याच पार पडलेल्या विकेन्डच्या एपिसोडमध्ये हे कनेक्शन खुद्द सलमानने देखील अधोरेखीत केलं. तसंच या दोघांचं कनेक्शन घरात सगळ्यात घट्ट असल्याचं मत सगळ्या स्पर्धकांनी दिलं. या दोघांना मग कनेक्शनच्या खुर्चीत बसवलं गेलं. त्यांच्यातली केमिस्ट्री तशी उत्तम रंगत आहे. पुढे यात काय होतं ते पहावं लागेल.

शेफाली-सिद्धार्थ डेची नोक-झोक

घरात दुसरं एक कनेक्शन बनू पाहत आहे असं दिसत आहे. लेखक सिद्धार्थ डे तसा बिग बॉस घरात खूपंच धमाल करत आहे. तसंच तो त्याचं कुठे कनेक्शन जुळतं का ते सुद्धा पाहत आहे. घरात शिरताच पहिल्या काही दिवसात त्याने लक्ष केंद्रीत केलं ते अँकर शेफाली बग्गावर. सुरुवातीला तिच्याकडून त्याला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी आता मात्र तिने देखील त्याच्यासोबत जवळीक वाढवायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विकेन्डच्या वारमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राँग कनेक्शन कोणामध्ये आहे? असा प्रश्न सलमानने विचारताच सिद्धार्थ आणि शेफाली दोघांनी एकमेकांचं नाव घेतलं. त्यामुळे आता आग दोनो तरफ बराबर लगी आहे का असा अंदाज बांधला जात आहे. तसंच ही खेळात टिकून रहायची स्ट्रॅटर्जी आहे असं देखील म्हंटलं जात आहे. नेमकं हे काय आहे ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईलंच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...