Bigg Boss 13: घरात पारसने दिली शेहनाझवरच्या प्रेमाची कबुली, बाहेर असलेल्या त्याच्या अफेअरचं काय?

मालिका-ए-रोज
Updated Oct 09, 2019 | 19:07 IST | चित्राली चोगले

बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन एकदम जोरदार सुरु आहे. सध्या घरात अनेकांनी लाईमलाईट खेचून घेतला आहे. त्यातली पारस आणि शेहनाझची लव्हस्टोरी तर अगदी सुरुवातीपासूनच हिट ठरत आहे. पण मग पारसच्या घराबाहेरच्या नात्याचं काय?

bigg boss 13 paras chhabbra accepts his love for co-contestant shehnaz gill so what happens to his affair outside
Bigg Boss 13: बिबी १३च्या घरात पारसने दिली शेहनाझवरच्या प्रेमाची कबुली, बाहेर असलेल्या त्याच्या अफेअरचं काय?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस घरात पारसकडून शेहनाझबद्दलच्या प्रेमाची कबुली
  • बिग बॉस घराबाहेर असलेल्या त्याच्या अफेरचं होणार काय?
  • गेममध्ये टिकून राहण्यासाठी पारसची आहे ही स्ट्रॅटर्जी?

मुंबई: बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन एकदम धमाकेदार नोटवर सुरु झालं. होस्ट सलमान खानने सुद्धा पहिल्याच विकेन्डच्या वारमध्ये सगळ्यांना सगळे उत्तम खेळत आहेत असं सांगितलं सुद्धा. यंदाचे बहुतेक स्पर्धक त्या मनाने बरे आहेत आणि आल्या दिवसापासून चर्चेत राहण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यात हॅण्डसम हंक पारस छाब्रा आणि शेहनाझ गील यांचं कनेक्शन तर आल्या दिवसापासून लाईमलाईट आपल्याकडे खेचून घेत आहे. त्यांची घरात सुरु असलेली सततची नोक-झोक आणि प्रेम पाहून ही जोडी अनेकांची फेव्हरेट बनली आहे. नुकतंच पारसने शहनाझबद्दल फिलिंग असल्याची कबुली पण दिली.

बिग बॉस घरात तर पारस अगदी छाती ठोकपणे शेहनाझबद्दल असलेलं प्रेम कबुल करतो खरं पण मग या बिग बॉसच्या घराबाहेर असलेल्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेअरचं होणार काय? रावण म्हणून लोकप्रियता मिळवलेला पारस खऱ्या आयुष्यात विघ्नहर्ता गणेश मालिका फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत तब्बल दोन वर्षांच्यावर रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनी याची अनेकदा कबुली दिली आहे. शिवाय दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर तर या एकमेकांच्याबद्दलच्या रोमॅण्टिक पोस्ट्सचा सडा आहे. असं असताना सुद्धा बिग बॉस घरात पारसने हे नवीन नातं कायम केलं आहे. इतकंच काय तर पारसच्या हातावर आकांक्षाच्या नावाचा टॅटू सुद्धा आहे. जो तो घरात कायम लपवताना दिसतो. 

 

 

 

 

पारस घराबाहेरील त्याच्या नात्याबद्दल सहासा बोलताना दिसत नाही पण नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सह-स्पर्धक आरती सिंगसोबत त्याने हा विषय काढला होता. तिने त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारत शेहनाझचा विषय काढला. तेव्हा तो म्हणाला होता की बिग बॉसमध्ये येताना त्याने आपलं नातं तोडलं आहे. त्याच्या प्रेयसीसोबत त्याचं फारसं पटत नाही, शिवाय त्यांची सतत भांडणं होतात आणि तो सांगून पण ती ऐकत नाही, घरी येऊन बसते. असं वगैरे तो म्हणताना दिसला. त्यावेळेस त्याने तिचं नाव उघड केलं नव्हतं. पण पारसच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन असं काही असेल असं वाटत नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Isse kehte hai adventurous PAPPI on the highest peak of the world...

A post shared by Paras Chhabra™ (@parasvchhabrra) on

 

 

 

 

 

बिग बॉस घरात जायच्या काही महिन्याआधीच त्याने आकांक्षासोबत किस करताना फोटो त्याच्या इंस्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच आकांक्षाने त्याला तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन घरात जाण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. या दोघांचे या व्यतिरिक्त बरेच पोस्ट आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात पारसचं जे काही सुरु आहे तो त्याचा गेम प्लॅन आहे, त्याची खेळात टिकून राहण्याची स्ट्रॅटर्जी आहे की खरंच त्याचं बाहेर असेललं अफेअर संपलं आहे, याबद्दल अद्यापतरी काही सांगता येणार नाही. पण येत्या काही दिवसात नक्कीच याबद्दल बरेच खुलासे होतील असं सध्या तरी दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी