[VIDEO] 'रश्मी देसाई किंवा 'हा' खेळाडू बिग बॉस विजेता होईल'

Bigg Boss 13: बिग बॉस १३चा स्पर्धक अरहान खान याने टेली टॉकशी खास बातचीत केली. यावेळी त्याने बिग बॉसचा विजेता कोण होईल याबाबत आपलं मत व्यक्त केलं.  

मुंबई: बिग बॉस १३च्या स्पर्धक अरहान खान काही दिवसांपूर्वीच घराबाहेर पडला. पण सध्या तो खूपच चर्चेत आहे. कारण सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या अमृता धनोआने असा आरोप केला होता की, अरहान खान यानेच तिला यात अडकवलं आहे. टेली टॉकशी बातचीत करताना अरहान म्हणाला की, त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. आपण त्या मुलीला ओळखत देखील नसल्याचं त्याने सांगितलं आहे.

यावेळी अरहान खानने बिग बॉस १३ विषयी देखील आपलं मत मांडलं. अरहान म्हणाला की, बिग बॉसच्या या सीजनचे विजेता हे रश्मी देसाई किंवा आसिम रियाज होऊ शकतं. याचवेळी त्याने आसिम आणि रश्मी यांच्या मैत्रीसोबत इतर मुद्द्यांवर देखील बातचीत केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी