Bigg Boss 13: ‘बिग बॉस चाहते है’ म्हणत बिग बॉस १३मध्ये यंदा महिलेचा आवाज घुमणार

मालिका-ए-रोज
Updated Sep 12, 2019 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

जगप्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस हिंदीमध्ये लवकरच तेरावं सीझन घेऊन येणार आहे. या तेराव्या सीझनची बरीच चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. या सीजन बद्दल एक अनोखी गोष्ट आता समोर आलीये. यंदा घरात महिलेचा आवाज घुमणार आहे.

bigg boss 13 will have women voice echo as bigg boss this season
Bigg Boss 13: ‘बिग बॉस चाहते है’ म्हणत बिग बॉस १३मध्ये यंदा महिलेचा आवाज घुमणार  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस हिंदी सीझन १३चा अनोखा खेळ
  • यंदा बिग बॉस हिंदी घरात धुमणार दोन आवाज
  • बिग बॉस १३मध्ये महिलेचा आवाज देखील देणार आदेश

मुंबई: जगप्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस सगळीकडेच फार लोकप्रिय आहे. नुकताच याच्या मराठी वर्झनचं सीझन २ प्रचंड गाजलं. त्यानंतर आता लक्ष आहे ते हिंदीच्या आगामी सीझनकडे. यंदा हिंदीचं तेरावं सीझन असून ते लवकरच सुरू होणार आहे. त्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. या सीझनमध्ये यंदा कोण दिसणार याशिवाय सीझनचं वैशिष्ट्य काय असणार? याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. होस्ट सलमान खानचे नवीन प्रोमो सुद्धा रिलीज केले गेले. अखेर सीझनबद्दल एक अनोखी चर्चा आता रंगली आहे आणि त्याबद्दलची माहिती मिळत आहे. बिग बॉस हिंदी सीझन 13 मध्ये बिग बॉस म्हणून यंदा एका महिलेचा आवाज ऐकायला मिळणार आहे असं समजतंय.

बिग बॉस चाहते है... असं म्हणणारा करारा आवाज दरवर्षी एका पुरुषाचा असतो. पण यंदा मात्र एक नाही तर घरात बिग बॉस म्हणून दोन आवाज घुमणार आहेत. आणि यातला एक आवाज असणार आहे महिलेचा. होय यंदा बिग बॉस मध्ये ‘बिग बॉस चाहते है’ असं महिलासुद्धा म्हणताना दिसणार आहे. त्यामुळे हे सीझन बिग बॉसच्या सगळ्या सीझनपैकी एकदम वेगळं ठरणार आहे. एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार यंदा महिलासुद्धा सगळ्या स्पर्धकांना आदेश देताना दिसेल. त्यामुळे आजवर कधीही न झालेली गोष्ट या हिंदी बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये घडताना दिसेल. त्यामुळे इतर अनेक चर्चेचा विषय सोबत या गोष्टीने सुद्धा या बिग बॉस १३ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ही महिला बिग बॉस म्हणूनच आदेश देताना दिसणार आहे की त्यामध्ये अजून काहीतरी वेगळा ट्विस्ट असणार आहे हे समजण्यासाठी मात्र सीझनची वाट पहावी लागणार.

या शिवाय चर्चेचा विषय आहे ते यंदा सीझनमध्ये कोणते चेहरे दिसणार यावरुन. आम्हाला मिळालेल्या माहिती प्रमाणे करन पटेल, देबोलिना भट्टाचार्य, दिलजीत कौर, शालिन भानोत, राजपाल यादव, सिद्धार्थ शुक्ला, महिका शर्मा, दयानंद शेट्टी, मेघना मलिक, विजेन्द्र सिंग, दानी डी, करन वोहरा, रेचल गुप्ता, आरुषी दत्ता, पूजा गोर, शिवीन नारंग, तेजस्विनी प्रकाश आणि आलिशा पालनवार या १८ जणांसोबत चर्चा असल्याचं समजतंय. यातली काही नावं यंदा बिग बॉस हिंदीच्या घरात दिसण्याची दाट शक्यता आहे. यातल्या काही स्पर्धकांचे प्रोमो तर रिलीज सुद्धा झाले आहेत आणि सध्या सगळीकडे गाजत देखील आहेत. पण फायनल स्पर्धकांची लिस्ट अद्याप कळू शकलेली नाही आहे. शिवाय यंदा मराठी बिग बॉस प्रमाणे हिंदी बिग बॉस पण लोणावळाऐवजी मुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये पार पडणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bigg Boss 13: ‘बिग बॉस चाहते है’ म्हणत बिग बॉस १३मध्ये यंदा महिलेचा आवाज घुमणार Description: जगप्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस हिंदीमध्ये लवकरच तेरावं सीझन घेऊन येणार आहे. या तेराव्या सीझनची बरीच चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. या सीजन बद्दल एक अनोखी गोष्ट आता समोर आलीये. यंदा घरात महिलेचा आवाज घुमणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय