मनसे-शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर कलर्स वाहिनीचा माफीनामा, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर

Colors apologise for remark on Marathi language: मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जान कुमार सानू याच्या विरोधात मनसे-शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता कलर्स वाहिनीने या प्रकरणी माफीनामा सादर

bigg boss 14 colors channel apologise for the remarks in relation to marathi language
मनसे-शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर कलर्स वाहिनीचा माफीनामा, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर 

Colors apologise for remark on Marathi language: टीव्हीवरील प्रसिद्ध असलेल्या रिअॅलिटी शो बिग बॉसचा १४वा सिझन (Bigg Boss season 14) सध्या सुरू आहे. या सिझनमधील मंगळवारी (२७ ऑक्टोबर) प्रसारित झालेल्या भागात जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) या स्पर्धकाने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. जान कुमार सानू याने केलेल्या मराठीच्या अवमानानंतर त्याच्या विरोधात शिवसेना (Shiv Sena)-मनसे (MNS)सह सर्वांनीच आक्रमक भूमिका घेतली. तसेच शूटिंग बंद पाडू असा इशाराही कलर्स वाहिनीला देण्यात आला होता. त्यानंतर आता कलर्स वाहिनी (Colors Channel)कडून आपला माफीनामा सादर करण्यात आला आहे.

कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माफीनामा सदर केला आहे. यासोबतच ट्वीटरवर एक पोस्ट करुनही माफीनामा सादर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये कलर्स वाहिनीने म्हटलं, "मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये मराठी भाषेच्या संदर्भात वक्तव्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता."

२७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉस१४च्या एपिसोडमध्ये जान कुमार सानू याचा निक्की तांबोळीसोबत वाद सुरू होता त्यावेळी त्याने मराठीचा अवमान करत म्हटलं मराठीची चीड येते. जान कुमार सानू याने केलेल्या या वक्तव्यानंतर मनसे, शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत माफी मागण्याची मागणी केली होती. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत जान कुमार सानू याला मनसे स्टाईलमध्ये इशाराच दिला आहे. अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, "जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला."

यानंतर अमेय खोपकर यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं, "मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंड कशी असतात ते समजलं."

तर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनीही जान कुमार सानू याच्या वक्तव्यानंतर ट्वीट करत म्हटलं, "Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करिअर घडवलेल्या गायक कुमार सानूचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी