बिग बॉस १४ने घोषित केली ग्रँड प्रीमियरची तारीख

मालिका-ए-रोज
Updated Sep 14, 2020 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

अखेर प्रतीक्षा संपली आहे. लोकप्रिय आणि खळबळजनक कार्यक्रम असलेला कार्यक्रम बिग बॉस १४ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Salman Khan Bigg Boss 14
बिग बॉस १४ने घोषित केली ग्रँड प्रीमियरची तारीख, निवेदक सलमान खान म्हणतो, ‘अब सीन पलटेगा’ 

थोडं पण कामाचं

  • कधी होणार बिग बॉस १४चा ग्रँड प्रीमियर?
  • कोण आहेत या सीझनचे स्पर्धक?
  • काय आहे कोरोनासाठी कार्यक्रम घेत असलेली खबरदारी?

मुंबई: अखेर प्रतीक्षा संपली (wait is over) आहे. लोकप्रिय आणि खळबळजनक कार्यक्रम (famous and controversial show) असलेला कार्यक्रम बिग बॉस १४ (Bigg Boss 14) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार (ready to entertain audience once again) आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला (new promo telecasted recently) आहे आणि यात कार्यक्रमाचा निवेदक सलमान खानने कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरच्या तारखेची घोषणा केली (host Salman Khan declared the date of Grand Premier in this promo) आहे. हा कार्यक्रम ३ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ९ वाजता (Grand Premier on 3rd October 2020, at 9 pm) होणार आहे.

कधी होणार बिग बॉस १४चा ग्रँड प्रीमियर?

या व्हिडियोत निवेदक सलमान खानचे हातपाय साखळ्यांनी जखडलेले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर मास्क आहे. यात तो म्हणत आहे की आता कंटाळा पळून जाईल, काळज्या निघून जातील, ताणतणाव अदृष्य होतील. या वाहिनीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, “२०२० ki har problem ko chaknachoor karne aa gaya hai #BiggBoss! #BB14 Grand Premier, 3rd October, Saturday raat 9 baje (sic)”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv) on

कोण आहेत या सीझनचे स्पर्धक?

या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाल्यास निया शर्मा, विवियन डिसेना, नमिश तनेजा, झैन इमाम, आमिर अली, आकांक्षा पुरी अशी मोठी नावे यासाठी चर्चेत आहेत. पण या सर्वांनीच अशा बातम्यांचे खंडन केले आहे आणि या अफवा असल्याचेही म्हटले आहे.

तर जास्मिन भसीन, पवित्रा पुनिया, रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा, ऐजाज खान, नैना सिंग, पंजाबी अभिनेत्री झारा गुरपाल हे सर्वजण बिग बॉस १४च्या घरात बंद होताना दिसणार आहेत.

काय आहे कोरोनासाठी कार्यक्रम घेत असलेली खबरदारी?

हा कार्यक्रम आधी सप्टेंबर महिन्यातच प्रदर्शित होणार होता, पण कोरोनाच्या संकटामुळे याचा एक महिना विलंब झाला. यातील सर्व स्पर्धकांना वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे आणि त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बिग बॉस १४च्या घरात प्रवेश देण्यात येणार आहे. हा सीझन हा सलमान खानने निवेदन केलेला ११वा सीझन असणार आहे.बिग बॉस १४ने घोषित केली ग्रँड प्रीमियरची तारीख, निवेदक सलमान खान म्हणतो, ‘अब सीन पलटेगा’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी