Bigg Boss 16 : सौंदर्या आणि गौतमच्या रोमान्सची अब्दू रोजिकने केली नक्कल, व्हिडिओ पाहून चाहते हैराण

मालिका-ए-रोज
Updated Nov 07, 2022 | 15:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss 16 : बिग बॉसचा (Bigg boss) प्रोमो सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सौंदर्या (Soundarya Sharma) आणि गौतम (Gautam Vig) आपला क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. सौंदर्या-गौतमला पाहून अब्दू रोजिक आणि शिव या दोघांची नक्कल करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हसू आवरणं कठीण होत आहे.

bigg boss 16 abdu rozik and shav thakrey mimicry video viral on social media
... अब्दू रोजिक-शिव ठाकरेची धमाल कॉमेडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सौंदर्या-गौतमच्या प्रेमाला आला बहर
  • बिग बॉसच्या घरातले ते लव्ह बर्ड्स
  • अब्दू रोजिक आणि शिव ठाकरेने केली सौंदर्या-गौतमची नक्कल

Bigg Boss 16 : बिग बॉसचा (Bigg boss) प्रोमो सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सौंदर्या (Soundarya Sharma) आणि गौतम (Gautam Vig) आपला क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. सौंदर्या-गौतमला पाहून अब्दू रोजिक आणि शिव या दोघांची नक्कल करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हसू आवरणं कठीण होत आहे. (bigg boss 16 abdu rozik and shav thakrey mimicry video viral on social media)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अधिक वाचा : बिग बॉसच्या घरात रंगणार 'विषय END' नॉमिनेशन टास्क


 बिग बॉसमध्ये (Bigg boss) प्यार और प्यार का पंचनामा हे काही नवीन नाही. याआधीही बिग बॉसच्या घरात कपल्स तयार झाली. काहींनी घराबाहेर पडल्यावर लग्नही केलं. 
तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अली गोनी आणि जस्मिन भसीन, मोनालिसा आणि विक्रांत ही अशी नावं आहेत जी त्यांच्या प्रेमासाठी ओळखली जातात. मग बिग बॉसचा हा सीझन तरी या सगळ्यापासून कसा मागे राहील. असंच काहीसं बिग बॉसच्या या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. बिग बॉस 16 मध्ये सौदर्या शर्मा (Soundarya Sharma) आणि गौतम विज (Gautam Vig) हे लव्ह बर्ड्स सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. या दोघांची केमिस्ट्री केवळ अफलातून आहे. सोशल मीडियावर त्यांच्या केमिस्ट्रीने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सौंदर्या शर्मा आणि गौतम विज एकमेकांसोबत त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही खूप रोमॅण्टिक मूडमध्ये असल्याचं दिसत आहे. त्यांचा हा रोमान्स पाहून अब्दू रोजिकलाही खट्याळपण करावासा वाटतोय. अब्दू रोजिक या दोघांची नक्कल करताना दिसत आहे. यामध्ये अब्दू रोजिक सौंदर्या शर्माच्या भूमिकेत दिसत आहे, तर शिव ठाकरे गौतमच्या भूमिकेत दिसत आहे. हे दोघंही  सौंदर्या आणि गौतमच्या रोमान्सची नक्कल करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अधिक वाचा : रोहित शर्माच्या चाहत्याला मैदानात घुसणे पडले इतके भारी की...


बिग बॉसचा हा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हसू आवरणं कठीण होत आहे. हा प्रोमो पाहून एका चाहत्याने कमेंट केली, "भाई, हे काय चालले आहे." तर दुसऱ्या एका चाहत्याचे म्हणणे आहे की, "अब्दू रोजिक हा खरा मनोरंजन करणारा आहे." तर अजून एकाने सांगितले, अब्दू आणि शिवची ही नक्कल पाहून त्यांना खूप मजा येत आहे. बिग बॉसचा हा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी