Bigg Boss 16 Finale Winner: या 3 मधून एका स्पर्धकाच्या नावावर होईल Bigg Boss 16ची ट्रॉफी

Bigg Boss 16 Finale Winner: बिग बॉस 16 (Bigg Boss 16)चा आज फिनाले आहे. कोणाच्या नावावर बिग बॉस 16 ची ट्रॉफी होणार हे अवघ्या काही वेळात समजणार आहे. चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा सीझन सलमान खान होस्ट करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एमसी स्टॅन, प्रियंका चाहर चौधरी, शिव ठाकरे हे टॉप थ्री मध्ये गेले आहेत.

Bigg Boss 16 Finale Winner: Out of these 3 contestants,take the title of Bigg Boss 16
या 3 स्पर्धकांपैकी एकाच्या हातात येणार Bigg Boss 16ची ट्रॉफी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 16 व्या सीझनची ट्रॉफी बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूल परिसरात असलेल्या घोड्याच्या आकाराच्या डिझाइनवरून प्रेरित आहे.
  • सोशल मीडिया पेजवर शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर, तर काहींमध्ये एमसी स्टॅन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • प्रियांका चाहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' च्या टॉप-3 स्पर्धकांमध्ये आहेत.

Bigg Boss 16 Finale Winner in Marathi:  कलर्स टिव्हीवरील (Colors TV)रिअॅलिटी शो (reality show) बिग बॉस 16 (Bigg Boss 16)चा आज फिनाले आहे. कोणाच्या नावावर बिग बॉस 16 ची ट्रॉफी होणार हे अवघ्या काही वेळात समजणार आहे. चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हा सीझन सलमान खान होस्ट करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एमसी स्टॅन, प्रियंका चाहर चौधरी, शिव ठाकरे हे टॉप थ्री मध्ये गेले आहेत. या  तिघांपैकी एक जण बिग बॉस 16 चा विजेता ठरणार आहे.  साधारण मध्यरात्री 12 वाजता विजेत्याचे नाव घोषित केले जाईल.  (Bigg Boss 16 Finale Winner: Out of these 3 contestants,take the title of Bigg Boss 16 ) 

अधिक वाचा  : WhatsApp,imagesने द्या Kiss Day च्या शुभेच्छा

या दरम्यान एक फोटो व्हायरल होत असून ज्यामध्ये सलमान बिग बॉसची विजेती म्हणून प्रियंकाचा हात उचलताना दिसतोय, तर नाराज झालेला शिव त्याच्या दुसऱ्या बाजुला उभा आहे.  परंतु या निकाल अजून यायचा बाकी आहे. यामुळे चाहत्यांनी आपल्या भावानांना आवर घालावी. परंपरेला अनुसरुन फिनालेच्या वेळी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक एकत्र येणार आहेत. 

अधिक वाचा  : तुमच्या प्रेमाला या सुंदर वॉलपेपरसह पाठवा खास massage

या दरम्यान विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफीसोबत आणखी काय काय मिळणार याचीही चर्चा रंगात आली आहे. जो कोणी 'बिग बॉस 16' चा विजेता असेल, त्याला ट्रॉफी व्यतिरिक्त 21 लाख 80 हजार रुपयांची बक्षीस रक्कम आणि आय10 Nios कार देखील मिळेल. यावेळची ट्रॉफीही खूपच सुंदर आणि हटके आहे. ट्रॉफीवर घोड्याची रचना आहे, 16 व्या सीझनची ट्रॉफी बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूल परिसरात असलेल्या घोड्याच्या आकाराच्या डिझाइनवरून प्रेरित आहे.  रिपोर्टनुसार बक्षिसाच्या रकमेत वाढ झाल्याचेही समोर आले. लेटेस्ट रिपोर्टनुसार, विजेत्याला 31 लाख रुपये मिळणार आहेत.

अधिक वाचा  : Happy Kiss Day Shayari: शायरी करत करा प्रपोज;लाजत देईल होकार

हा स्पर्धेक होऊ शकतो विजेता

प्रियांका मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यात चुरशीची लढत आहे.  प्रियांका चाहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' च्या टॉप-3 स्पर्धकांमध्ये आहेत. लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार, प्रियांका अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. तिला ऑरमॅक्सच्या रेटिंगमध्येही पहिले स्थान मिळाले आहे.  काही सोशल मीडिया पेजवर शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर, तर काहींमध्ये एमसी स्टॅन दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस 16 च्या फिनालेला उपस्थित राहणार अब्दु रोजिक

बिग बॉस 16 मध्ये सहभागी झालेला ताजिकिस्तानचा अब्दु रोजिक बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला उपस्थित राहणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून अब्दु रोजिकने शिव ठाकरेसाठी मतदान करण्याचे आवाहन  केले होते. आता ग्रँड फिनालेच्या निमित्ताने अब्दु रोजिक भारतात येत आहे. बिग बॉस 16 मधील सर्वात क्यूट स्पर्धक म्हणून अब्दु रोजिकची ख्याती होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना अब्दु रोजिकला टीव्हीवर बघण्याची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी